spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जालन्यात एकनाथ शिंदेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

सध्या महाराष्ट्रामध्ये राजपल्यांचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विदर्भ (Vidarbha) दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाने (Samriddhi Highway) नागपूर (Nagpur) गाठले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला जालन्यात (Jalna) काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. दरम्यान विद्यार्थी (students) प्रश्नांवरून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे (black flags) दाखविण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. जालन्यातील जामवाडी जवळ जमावाने एकत्र येऊन काळे झेंडे दाखवले. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. दरम्यान अप्लसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. यावरून संतप्त कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे दाखवणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे आणि कामगार आघाडीचे कार्यकर्ते होते.

लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) समृद्धी महामार्गाची पाहणी करत आहेत. समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी आज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर ते शिर्डी असा सोबत प्रवास करून समृद्धी महामार्गाची ट्रायल घेत आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत पाहणी करत आहेत.

हे ही वाचा : 

प्रसाद लाड यांना अमोल कोल्हेंनी जोडले कोपरापासून हात

शिवरायांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही, गुलाबराव पाटील संतापले

यवतमाळमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss