spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सिद्धू मूसवालाच्या हत्येवर दिलजीत दोसांझने दिली प्रतिक्रिया म्हणाला “हे सरकारचे अपयश आहे”

पंजाबचा गायक सिद्धू मुसेवालाचे हत्या प्रकरण हे खूप मोठ्याप्रमाणात गजल होत. तर या प्रकरणाचे सूत्र मुंबईतील कारागृहातून हलवली गेले आणि कड देखील मुंबईतील कारागृहातच रचला गेला असल्याचेही उघड झाले होते. तर आता या प्रकरणावर पंजाबचा गायक , अभिनेता, चित्रपट निर्माता दिलजीत दोसांझ याने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दिलजीत दोसांझने “१००% ये सरकार की नालायकी है. “असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणानंतर संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. तर सिद्धू मुसेवालाची हत्या पंजाबमध्ये झाली असून त्याच्या हत्येचा कट मुंबईतील कारागृहात रचण्यात आला होता असे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले होते. यानंतर सिनेसृष्टीतील बड्या अभिनेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.तर आय या प्रकरणी पंजाबमधील गायक , अभिनेता, चित्रपट निर्माता दिलजीत दोसांझ याने एक खुलासा केला आहे. दिलजीत दोसांझने एका नवीन मुलाखतीत, कलाकारांच्या पालकांबद्दल आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना किती मानसिक त्रास सहन करावा लागतो याबद्दल सांगितले आणि यापूर्वीही अनेकदा कलाकारांना मारले गेले आहे. पण एकूणच कलाकारांच्या हत्येसाठी दिलजीतने सरकार जबाबदार असल्याचे सांगितले आहे.

दिलजीतने या मुलाखतीत सिद्धू मुसावाला यांच्या नुकत्याच झालेल्या मृत्यूंबद्दल आणि स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगितल की,“सर्व कलाकारांच्या प्रसिद्धीचे कारण हे त्यांनी केलेले कठोर परिश्रम असतात. दिलजीतला वाटत नाही की एखादा कलाकार कोणाचेही वाईट करू शकतो. दिलजीतला ते मान्य नाही. सिद्धूच्यात आणि इतरांमध्ये काहीही भांडण असू शकत नाही. मग तो दुसऱ्याला का मारेल? त्याबद्दल बोलणे देखील खूप कठीण आहे.” असे दिलजीतने सांगितलं तसेच तो पुढे म्हणाला “याचा विचार करा, तुम्हाला फक्त एक मूल आहे आणि तो मरण पावला. त्याचे वडील आणि आई, ते कसे जगत असतील. ते कशातून जात आहेत याची तुम्ही कल्पना करू शकत नाही, फक्त त्यांनाच माहीत आहे,” असे सिद्धू मुसेवालाच्या पालकांबद्दल बोलताना दिलजीतने मुलाखतीत सांगितलं आहे.दिलजीतने पुढे सांगितलं की “हे १००% सरकारचे अपयश आहे. हे राजकारण आहे आणि राजकारण खूप वाईट असत . त्याला न्याय मिळावा आणि अशी दु:खद घटना पुन्हा घडू नये यासाठी दिलजीत देवाकडे प्रार्थना करणार असल्याचे सांगितलं आहे.

हे ही वाचा :

प्रसाद लाड यांना अमोल कोल्हेंनी जोडले कोपरापासून हात

यवतमाळमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss