spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात बांगलादेशचा एक गाडी राखून विजय

India vs Bangladesh :भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात बांगलादेशचा एक गाडी राखून विजय

भारत विरुद्ध बांगलादेशचा आजचा सामना एकदम जोरदार सुरु आह. सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.तर भारतीय संघाने चार अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरवले आहेत. तर या वेळेस भारतीय संघात खेळण्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma), शिखर धवन (Shikhar Dhawan), विराट कोहली (Virat Kohl), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), केएल राहुल (KL Rahul), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) , दीपक चहर (Deepak Chahar) , मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj), कुलदीप सेन (Kuldeep Sen) या खेळाडूंची निवड करण्यात आली होती तर आता सध्या भारताला सामना जिंकण्यासाठी फक्त एका विकेटची गरज आहे.

भारतीय संघाने १८६ धाव करत फलंदाजी पूर्ण केली आहे. या वेळेस भारताच्या के.एल राहुल या खेळाडूं ७३ धाव करत चांगली खेळी केली आहे. तर आता १८७ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने पहिल्याच चेंडूवर बांगलादेश संघाचा ओपनर नुरुल हसन ( Nurul Hasan) बाद झाला, त्याला दीपक चहरने बाद केले.नुरुल हसन बाद झाल्यानंतर मोहम्मद सिराजने पहिल्या पॉवरप्लेच्या अंतिम षटकात १४ धावांवर अनामुळंक्कला बाद केले. शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आणि कर्णधार लिटन दास (Litton Das) यांनी नंतर बांगलादेशसाठी गोष्टी स्थिर केल्या, लिटनला वॉशिंग्टन सुंदरने ४१ धावांवर बाद केले.तर विराट कोहलीने सुंदरच्या गोलंदाजीवर २९ धावांवर शकीबचा चेंडू झेलत शकीबला बाद केले.सध्या भारताला जिंकायला एकाच विकेची गरज आहे त्यामुळे या सामन्याचा उत्साह अजून वाढला आहे.

मुशफिकुर रहीम आणि महमुदुल्लाह यांनी मोहीम काही काळासाठी स्थिर ठेवली होती तर पण लागोपाठच्या चेंडूंमध्ये हे दोघेही बाद झाली. ते बाद झाल्यानंतर कुलदीप सेनने एकाच षटकात दोन विकेट घेत बांगलादेशला बॅकफूटवर ढकलले होते.तत्पूर्वी, शाकिब आणि इबाडोत हुसैन यांनी भारताचा धुव्वा उडवला कारण प्रथम फलंदाजीला संधी मिळाल्यावर दोघांनी ४१.२ ओव्हरमध्ये १८६ धावां करून खेळ पालटला .

या सामन्यात भारतीय संघाचा गोलंदाज दीपक चहर याने पूर्णपणे प्रयत्न केला होता तर बांगलादेश संघाच्या मुस्ताफिझूर आणि हसन यांनी चांगली भागीदारी करत सामन्यात विजय मिळवला.

हे ही वाचा :

ओमराजे निंबाळकरांनी पुन्हा एकदा राणा जगजितसिंह पाटलांना डिवचलं

सिद्धू मूसवालाच्या हत्येवर दिलजीत दोसांझने दिली प्रतिक्रिया म्हणाला “हे सरकारचे अपयश आहे”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss