spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मनसे नेते वसंत मोरेंना राष्ट्रवादीकडून ऑफर, अजित पवार म्हणाले तात्या कधी येता?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) पुण्यातील (Pune news) आक्रमक आणि प्रमुख चेहरा असलेले वसंत मोरे (Vasant More) हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist congress party प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांच्यासारख्या नेत्याला आपल्या गटात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वसंत मोरे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

हेही वाचा : 

Gujrat Election पंतप्रधान मोदी व अमित शहा आज मतदानाचा हक्क बजावणार, ९३ जागांवर आठशेच्यावर उमेदवार नशीब आजमावणार

एका विवाह सोहळ्यामध्ये वसंत मोरे आणि अजित पवार या दोघांनीही हजेरी लावली होती. त्याचवेळी अजित पवार- वसंत मोरे यांची भेट झाली आहे. भेटीवेळी अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्यासाठीची ऑफर दिली आहे. अजित पवार तात्या कधी येता… वाट पाहतोय, असं म्हणाले आहेत. अजित पवारांच्या वक्तव्याला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्यामुळे मनसेमध्ये खळबळ वाढु शकते. वसंच मोरे पुण्यातील मनसेचा चेहरा आहेत. त्यामुळे वसंत मोरे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागुन असणार आहे.

उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकरांची आज पुन्हा भेट होणार, युतीचा निर्णयावर शिक्कामोर्तब?

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेली भुमिका वसंत मोरे यांना रुचली नाही. त्यानंतर मोरे यांनी ठाकरे यांची भेट घेतली आणि आपलं मत बोलून दाखवलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्त केलं होतं. वसंत मोरे यांच्या या भूमिकेमुळे राज ठाकरे आणि पुण्यातील मनसेचे नेते नाराज झाले होते. परंतु, वसंत मोरे शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. त्यानंतर वसंत मोरे शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांना भेटले होते. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी आपण पक्षातून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

Datta Jayanti 2022 तुम्हाला माहित आहे का त्रिमुर्ती प्रभु दत्तात्रेय उदयास कसे आले ?

Latest Posts

Don't Miss