spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Datta Jayanti 2022 श्री दत्त जयंतीनिम्मित व्हाट्सअँपद्वारे द्या शुभेच्छा

श्री दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा दत्त जयंती ७ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच बुधवारी साजरी करण्यात येणार आहे.

Datta Jayanti 2022 : श्री दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा दत्त जयंती ७ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा चंद्र कृत्तिका-रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत सिद्ध आणि सर्वार्थसिद्धी योगात श्री दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार मानले जातात. त्रिमुखी म्हणजेच ३ चेहरे आणि ६ भूजा म्हणजेच हात असलेल्या श्री दत्तात्रेय भगवान यांच्यात तिन्ही देवतांची शक्ती सामावली आहे असे म्हणतात. ७ डिसेंबरला सकाळी ८ वाजून ०२ मिनिटांला मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. तर ८ डिसेंबरला सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांला पौर्णिमा समाप्त होणार आहे.

  • दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा!
  • ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरू दिसले – दत्तगुरू जयंतीच्या शुभेच्छा!
  • गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
    गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
  • दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,
    हरपले मन झाले उन्मन
    मी तूपणाची झाली बोळवण,
    एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान
    दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • !! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
    श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व
    आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक
    मंगलमय शुभेच्छा!!
  • आता नको दिव्यदृष्टी, आता नको ही जडसृष्टी
    फक्त असावी आपल्यावर, आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी
  • दत्तगुरुंचे नाम स्मरा हो, दत्तगुरुंचे भजन करा
    हे नामामृत भवभयहारक, असंहारक त्रिभुवनतारक
    दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
  • ज्याच्या मनी गुरु विचार
    तो नसे कधी लाचार।
    ज्याच्या अंगी गुरु भक्ती
    त्याला नाही कशाची भीती|
    ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती
    त्याची होई जगभरात किर्ती।
    जो करेल गुरु ची पूजा
    त्याच्या आयुष्यातील दु:ख होईल वजा
    श्री दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
  • दत्तकथा वसे कानी
    दत्तमूर्ती ध्यानीमनी
    दत्तालागी अलिंगना कर
    समर्थ हे जाणा
    दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • आत्मसुखाचा मोक्ष लुटाया,
    अमोल ठेवा हाती धरा
    दत्तचरण माहेर सुखाचे,
    दत्तभजन भोजन मोक्षाचे
    दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

हे ही वाचा : 

Datta Jayanti 2022 दत्तजयंतीनिम्मित जाणून घ्या भगवान दत्ताची कथा

Datta Jayanti 2022 तुम्हाला माहित आहे का त्रिमुर्ती प्रभु दत्तात्रेय उदयास कसे आले ?

Datta Jayanti 2022 दत्त जयंती माहिती

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss