spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या युतीवर दीपक केसरकारांचा टोला

सध्या महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) शिवशक्ती (Shiva Shakti) आणि भीमशक्ती (Bhimashakti) एकत्र येण्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. जे कधी महापरिनिर्वाण (Mahaparinirvana) दिनाला बॅनर लावत नव्हते. त्यांना मदतीची गरज आहे. हिंदुत्व सोडलं म्हणून वंचितही गरज आहे, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. आधी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) सोबत युती केली. आता वंचितशी सलगी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर जायचं की, नाही याचा निर्णय वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना घ्यायचा आहे. तो निर्णय ते योग्य पद्धतीनं घेतली, असं मला वाटते. कारण त्यांना बाबासाहेब यांचा वारस आहे. बाबासाहेबांचा वारस चालवत असताना मतं कुठं मिळतील, यापेक्षा बाबासाहेबांचा वारसा जपनं हे अधिक महत्त्वाचं असतं.

विचाराचा ठेवा महाराष्ट्राच्या पलीकडचा आहे. तो ठेवा जपला गेला पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वाटते, असं दीपक केसरकर म्हणाले. तो ठेवा जपला गेला पाहिजे. त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत, असंही ते म्हणाले. विरोधक विरोध करणारचं आम्ही असतो तर हे झालं नसतं, असं म्हणतात. पण, अनेक गोष्टी केंद्राच्या नियंत्रणाखाली असतात. राज्याच्या नियंत्रणात काय आहे, याचा विचार करून स्टेटमेंट केली गेली पाहिजे. काहीही झाला की, ते सरकारवर टाकायचं हा रडीचा खेळ असतो, असा आरोपही दीपक केसरकर यांनी केला.

महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाद हा आजचा नाही. गेल्या ५० वर्षांपासून हा वाद सुरू आहे. बाळासाहेब म्हणाले होते की, सीमाभागातील नागरिकांचं हित जोपासू, हे तुम्ही अडीच वर्षे जोपासू शकले नाही, अशी टीकाही केसरकर यांनी केली.

हे ही वाचा : 

पुण्यात राज ठाकरेंना बसला मोठा धक्का!

Bigg Boss Marathi 4 घरातील सदस्यांना बसला धक्का, ‘हे’ सदस्य होणार बाहेर

‘वेड’ सिनेमातील ‘बेसुरी’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss