spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MVA Live : १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चा, मविआने केली घोषणा

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांची आज बैठक पार पडली आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून पत्रकार परिषद घेण्यात आलं. या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), शिवसेने नेते आणि युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पत्रकार परिषदे दरम्यान उपस्थित होते. पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांचाकडून मोठी घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीकडून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मविआच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. त्यानुसार १७ डिसेंबर (December 17) रोजी सकाळी ११ वाजता जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. यामध्ये सर्व महाराष्ट्र प्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन मविआच्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे.

राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे, शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं जात आहे, सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. त्याविरोधात आता येत्या १७ तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये मोर्चाचा हा निर्णय घेण्यात आला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धुळीस मिसळत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडे जात आहेत. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान धुळीस मिळत आहे. गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवली. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने राज्यातील उद्योग आता कर्नाटकला जाणार का? या सगळ्यावरून राज्यात मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडतोय.”

हे ही वाचा : 

शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीबाबत अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीबाबत अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या युतीवर दीपक केसरकारांचा टोला

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss