spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, अजित पवार

मराठी भाषिक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या गाड्यांवरचा हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरचा (Maharashtra and Karnataka Border Dispute) हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारने खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी असे आवाहनही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला केले.

हेही वाचा : 

ठाकरे गटाचे खासदार उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता

कर्नाटक सरकारच्या पाठींब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra) यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्रसरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीने सीमाभागातील मराठी (Karnataka border) भाषिकांच्यामागे ठामपणे उभे आहेत. सत्तारुढ पक्षांनीही आपले कर्तव्य पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेवू नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे. अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला खडसावले आहे.

Oh My God 2 अक्षय कुमार आगामी चित्रपट ‘ओह माय गॉड २’मधून देणार लैंगिक शिक्षणाचे धडे, सोशल मीडियात चर्चा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून (Maharashtra Karnatak Border issue) कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर कृत्य आणि वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झालेत तर महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. येत्या २४ तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक (Marathi speaking) जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.

Maharashtra and Karnataka Border Dispute पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या गाड्यांना फासलं काळं

Latest Posts

Don't Miss