spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संभाजीराजे छत्रपती यांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

मागील काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील (Maharashtra) सीमाप्रश्नाचा वाद पुन्हा चर्चेत आलेला असतानाच आज बेळगावजवळ (Belgaum) महाराष्ट्रातील नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांवर दगडफेक (stone throwing) करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद पुण्याबरोबरच राज्यातील अन्य शहरांमध्येही उमटण्यास सुरुवात झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटक सरकारला हे हल्ले थांबवण्यासाठी २४ तासांचं अल्टीमेट दिलं आहे. या प्रकरणानंतर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन घडलेल्या घटनेबद्दल तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला आहे. अशातच आता थेट संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

यावरच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही आपली प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. ते म्हणाले आहेत की, राज्य सरकार डोळे मिटून बसलं आहे. राऊत म्हणाले की, स्वाभिमान, अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, आपल्या लोकांविषयी प्रेम आहे की नाही. पुण्यात शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांना शिंदे-फडणवीस सरकारचे पोलीस लाठ्या काठ्यांनी मारहाण करत आहेत. कोल्हापुरातही तेच सुरु आहे. तुम्ही कोणाचं काम करत आहात, असा प्रश्न राऊत यांनी राज्य सरकारला केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लक्ष्य करत राऊत म्हणाले आहेत की, या घटनेनंतर सरकार काय करत आहे. मुख्यमंत्री कुठे आहेत? जे सांगतात आम्ही त्या काळात बेळगावात जाऊन लाठ्या-काठ्या खाल्या. जर तुम्ही सीमाप्रश्नासाठी लाठ्या खाल्या आहेत, तर आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहेत, त्या खुर्चीवरून महाराष्ट्राचा कर्नाटकने केलेला अपमान तुम्ही पाहिला नसता.

हे ही वाचा : 

‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, अजित पवार

ठाकरे गटाचे खासदार उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss