spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CHRISTMAS 2022 ख्रिसमस सण साजरा करण्याची विविध देशांची विविध पद्धती

CHRISTMAS 2022 : २५ डिसेंबरला ख्रिसमस हा सण भारतासह विविध देशात देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. डिसेंबर महिन्यात ख्रिसमस या सणाला खूप महत्व दिले जाते. तसेच २५ डिसेंबर ह्या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. काही ठिकाणी हा सण ६, ७ किंव्हा १९ जानेवारी ला एपिफानी म्हणून साजरा करतात. हा सण १२ दिवसांचा असून ख्रिसमस्टाईड पर्वाची सुरुवात होते.

ख्रिसमस हा सण ख्रिश्चन धर्माचा असला तरी हा सण सर्वच धर्माचे लोक साजरा करतात. बहुतेक लोक ख्रिसमस हा सण वेगवेगळया पद्धतीने बनवतात. ख्रिसमस सणाच्या आधल्या दिवशी ख्रिस्ती धर्माचे लोक चर्च मध्ये जातात, आणि मेणबत्त्या पेटवतात, आणि प्रार्थना करतात त्यानंतर ख्रिसमस ट्री सजवून, केक कापून, वेगवेगळया पद्धतीचे पदार्थ बनवून पार्टी करतात. तसेच इतर धर्माच्या लोकांना देखील हे सर्व करायला आवडतात. त्यामुळे बहुतेक लोक ख्रिसमस ट्री सजवून ख्रिसमस हा सण का साजरा करतात. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून कोणत्या देशात ख्रिसमस हा सण साजरा केला जातो या बदल सांगणार आहोत.

 

जर्मनी (Germany) या देशामध्ये ख्रिसमसच्या झाडाची सुरुवात ही जर्मनी पासून झाली. ख्रिश्चनांनी मध्ययुगात परंपरा सुरू केली. ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस तरी घरात आणले जाते आणि त्याला मध्यरात्री सजवले जाते. आणि त्याच बरोबर ख्रिसमसच्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा देखील आहे.

रशिया (Russia) या देशामध्ये ७ जानेवारी रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला जातो, काही कॅथलिकांनी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा करण्याचे ठरवले. याचे कारण असे की रशियन ऑर्थोडॉक्स चर्च धार्मिक उत्सवांसाठी वेगळे जुने कॅलेंडर ज्युलियन म्हणून ओळखले जाते वापरते. नवीन वर्षाची सुरुवात ही संध्याकाळ पासून होते. म्हणून ख्रिसमस हा सण साजरा केला जातो.

जपानमध्ये (japan) ख्रिसमस हा सण Religious holiday म्हणून साजरा केला जात नाही त्याकडे देशात आनंद पसरवण्याची वेळ म्हणून पाहिले जाते. कारण ख्रिसमस ही जपानी लोकांसाठी एक नवीन संकल्पना आहे. ख्रिसमसच्या दिवशी तळलेले चिकन जपान मध्ये अधिक लोकप्रिय आहे, म्हणून KFC सारखी रेस्टॉरंट Advance order घेतात.

ब्राझील (brazil) मध्ये देखील ख्रिसमस हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ब्राझील मध्ये ख्रिसमसच्या दिवशी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. आणि एकमेकांना भेटवस्तू देखील देतात.

भारतात (india) २५ दशलक्षाहून अधिक ख्रिश्चन लोक राहतात, मुंबईसारख्या मोठ्या शहरात ख्रिश्चन लोक वेगवेळ्या प्रकारे ख्रिसमस हा सण साजरा करतात. पारंपारिक पद्धतीने ख्रिसमस ट्री, आंबा किंवा केळीच्या झाडांनी सजवले जाते, तर चर्चमध्ये जाऊन मध्यरात्री मेणबत्या लावतात आणि प्रार्थना करतात.

हे ही वाचा : Christmas 2022 जाणून घ्या नाताळ विषयी थोडक्यात माहिती

 

Latest Posts

Don't Miss