spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Datta Jayanti 2022 दत्त जयंती निमित्त नैवेद्यसाठी बनवा सुंठवडा, जाणून घ्या रेसिपी

Datta Jayanti 2022 : श्री दत्त जयंती (Datta Jayanti ) मार्गशीर्ष (Margashirsh) महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावेळी दत्त जयंती ७ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा चंद्र कृत्तिका-रोहिणी नक्षत्रात आणि वृषभ राशीत सिद्ध आणि सर्वार्थसिद्धी योगात श्री दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार मानले जातात. त्रिमुखी म्हणजेच ३ चेहरे आणि ६ भूजा म्हणजेच हात असलेल्या श्री दत्तात्रेय भगवान यांच्यात तिन्ही देवतांची शक्ती सामावली आहे असे म्हणतात. तसेच प्रत्येक सणामध्ये प्रसाद हा दाखवला जातो आणि त्या प्रसादासाठी वेगवेगळे प्रकारचे नैवेद्य देखील बनवले जातात, दत्त जयंतीचा उत्सव हिवाळ्यात येत असल्याने सुंठवडा हा पदार्थ नैवेद्यसाठी बनवला जातो.

साहित्य :
खारीकचे तुकडे
बदाम
काजू
१ चमचा बडीशेप
१ चमचा पांढरे तीळ
१ चमचा खसखस
वेलची
सुख्या खोबऱ्याचा किस
साखर
खडी साखर
मनुके
सुंठ पावडर

 

कृती :

सर्व प्रथम कढईमध्ये खारीख बदाम, काजू, बडीशेप, पांढरे तीळ, खसखस, वेलची, सुख्या खोबऱ्याचा किस हे मिश्रण घालून घेणे आणि चांगले भाजून घेणे. त्यानंतर मिक्सर मध्ये बडीशेप, पांढरे तीळ, खसखस, वेलची, सुख्या खोबऱ्याचा किस घालून घेणे आणि त्यामध्ये साखर आणि खडी साखर घालून घेणे. त्यानंतर काजू बदाम सूंठ पावडर घालून घेणे आणि मिक्सर मध्ये वाटून घेणे. वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये मनुके घालून घेणे आणि मिश्रण एकजीव करून घेणे. अशाप्रकारे सुंठवडा ही रेसिपी तयार आहे. सुंठवडा ही रेसिपी खूप चविष्ट लागते, आणि नैवेद्यसाठी उत्तम पदार्थ आहे. तसेच तुम्ही सुंठवडा ही रेसिपी कोणत्याही सणामध्ये नैवेद्यसाठी बनवू शकता. जर तुम्हाला अजून या रेसिपी मध्ये सुका मेवा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. तसेच सुंठवडा ही रेसिपी आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

 

Latest Posts

Don't Miss