spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Datta Jayanti 2022 आज दत्त जयंती, देवी अनुसूयाच्या धर्माची परीक्षा कशी घेतली घ्या जाणून

हिंदू पंचागानुसार, भगवान दत्तात्रेयांची जयंती (Datta Jayanti 2022) दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. पौर्णिमेला पूजा, गंगेत स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे.

Dattatreya Jayanti 2022 : हिंदू पंचागानुसार, भगवान दत्तात्रेयांची जयंती (Datta Jayanti 2022) दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. पौर्णिमेला पूजा, गंगेत स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान दत्तात्रेय हे असे देवता आहेत. ज्यामध्ये भगवान शंकर, विष्णू आणि ब्रह्मा एकत्र आहेत. याशिवाय गुरू आणि देव या दोघांचे रूप भगवान दत्तात्रेयांमध्ये सामावलेले आहे. त्यांना ३ मुख आणि ६ हात आहेत. गाय आणि कुत्रा नेहमी त्यांच्यासोबत राहतात. भगवान दत्तात्रेयांनी आपले २४ गुरू स्वीकारले आहेत. त्यांची पूजा केल्यावर त्रिमूर्तींचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय, तिन्ही देवांनी देवी अनुसूयाच्या धर्माची परीक्षा घेतली आणि तिच्यावर प्रसन्न झाले, तेव्हा ते तिन्हींच्या संयुक्त रूपाने जन्मले.

हे ही वाचा :   Datta Jayanti 2022 तुम्हाला माहित आहे का त्रिमुर्ती प्रभु दत्तात्रेय उदयास कसे आले ?

पौराणिक कथा –

ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नींना (देवी सावित्री, देवी लक्ष्मी, देवी पार्वती) आपापल्या पतिधर्मावर अत्यंत गर्व होता आणि त्या सतत त्याचे गुणगान देखील गात असत.

एकदा नारदमुनी तिनही लोकांत भ्रमण करीत करीत त्यांच्याजवळ येतात. त्यासमयी त्या तिन्ही देवींचे आपापले पतिधर्माचे गुणगान सुरू असते. तेव्हां नारदमुनी त्यांना अत्रीऋषींच्या पत्नी ‘अनुसुये’ बद्दल अवगत करतात. अनुसुया त्या तिघींपेक्षा देखील उत्तम रितीने पतिधर्म पाळते आहे हे नारदमुनींच्या तोंडुन ऐकुन त्यांचा जळफळाट होतो आणि तिचा पतिधर्माचा भंग करण्याकरीता त्या तिनही देवी आपापल्या पतीला आग्रह करतात.

स्त्रीहट्टापुढे ब्रम्हा, विष्णु आणि महेश या तिनही देवांचा नाईलाज होतो आणि ते तिघेही भिक्षेकारांच्या रूपात अ़त्रीऋषींच्या आश्रमासमोर जाऊन उभे राहातात. ‘ओम् भवती भिक्षांदेही’ असा आवाज ऐकुन अनुसुया माता आश्रमाबाहेर येते आणि त्या तिनही भिक्षेकारांना भिक्षा देऊ लागते त्यावेळी ते तिघे म्हणतात ‘आम्हाला भिक्षा नको आम्हाला भोजन हवे आहे ‘अनुसुया त्यांना आश्रमात बोलवते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते. स्वयंपाक होताच ती ज्यावेळी त्यांच्याकरता ताट वाढु लागते त्यावेळी ते तिघे म्हणतात आम्हाला भोजन नको ‘‘जोपर्यंत तु नग्न होऊन आम्हाला वाढणार नाही तोपर्यंत आम्ही जेवणार नाही’’.

अत्रीऋषींची पत्नी अनुसुया ही साधारण स्त्री नव्हती ती एक पवित्र पतिव्रता होती. ही साधारण माणसं नसुन आपली परिक्षा घेण्याकरता आली असल्याचे तिने जाणले आणि त्यांच्या ईच्छेचा आदर ठेवत आपल्या पतिचे स्मरण करून त्या तिघांवरही पाणी शिंपडले त्याक्षणी ती तिघेही बाळे झालीत आणि रांगु लागली. अनुसुयेने त्या तिघाही बालकांना आपले दुध पाजले. बाहेरून आल्यानंतर अत्रीऋषींना झालेला प्रकार लक्षात आला.

बरेच दिवस झाले परंतु आपले पति घरी आले नाहीत या चिंतेने त्या तिनही देवींना आपली चुक लक्षात आली त्यांनी अनुसुया मातेला क्षमा मागीतली त्यावेळी अनुसुया माता म्हणाली ‘या तिघांना मी माझे दुध पाजले आहे. ही तिघेही माझी बालके झाली आहेत त्यामुळे यांना माझ्याजवळच राहावे लागेल त्यावेळी तीनही भगवान आपल्या प्रत्यक्ष रूपात अवतरीत झाले आणि आपापल्यातुन एक अंश काढुन एक नवा अवतार तयार केला. त्रिमुर्ती प्रभु दत्तात्रेय उदयास आले…..

दत्त जयंती २०२२ – तारीख आणि शुभ वेळ

दत्त जयंती तारीख : ७ डिसेंबर २०२२
पौर्णिमा तारीख सुरू होते : ७ डिसेंबर, सकाळी ०८:०४ पासून
पौर्णिमा संपेल : ८ डिसेंबर सकाळी ०९:४० वाजता

दत्त जयंती २०२२ – शुभ योग – 

यंदा भगवान दत्त जयंती बुधवारी साजरी होत असून या दिवशी पौर्णिमा, सिद्ध योग निर्माण होत आहे. या शुभ योगात भगवान दत्तांची पूजा करून गंगेत स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते.

भगवान दत्तात्रेय पूजा पद्धत –

ब्रह्ममुहूर्तावर पहाटे लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करावे व नंतर सात्विक रंगाचे स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेला पूजा मांडावी. गंगेचे पाणी शिंपडून जागा शुद्ध करा. यानंतर भगवान दत्तात्रेयांचे चित्र स्थापित करा. अक्षता, रांगोळीळी, पिवळे चंदन, फुले, फळे इत्यादींनी पूजा करावी. देवाला प्रसाद अर्पण करून उदबत्ती व दीप लावून आरती करावी.

हे ही वाचा : 

Datta Jayanti 2022 दत्त जयंतीनिमित्त जाणून घ्या पूजा करण्याची पद्धत

Datta Jayanti 2022 दत्त जयंती निमित्त नैवेद्यसाठी बनवा सुंठवडा, जाणून घ्या रेसिपी

Datta Jayanti 2022 श्री दत्त जयंतीनिम्मित व्हाट्सअँपद्वारे द्या शुभेच्छा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss