spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Parliament Winter Session जी-20 च्या माध्यमातून भारताला जगाला सामर्थ्य दाखवण्याची संधी, नरेंद्र मोदी

नवे किंवा तरुण खासदार यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि भावी पिढीला तयार करण्यासाठी त्यांना सभागृहात जास्त संधी द्यावी. त्यांचा सभागृहाच्या कामकाजातील सहभाग वाढला पाहिजे.

Parliament Winter Session : नवे किंवा तरुण खासदार यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि भावी पिढीला तयार करण्यासाठी त्यांना सभागृहात जास्त संधी द्यावी. त्यांचा सभागृहाच्या कामकाजातील सहभाग वाढला पाहिजे. सभागृहात होणारा गोंधळ, स्थगिती यामुळे खासदारांचं नुकसान होत असल्याचं मला अनेकांनी सांगितलं आहे. त्यांच्या वेदना तुम्ही समजून घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांना आणि सभागृह नेत्यांना केलं आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) सुरुवात होत आहे. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी देशासह तरुण खासदारांना आवाहन केलंय.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, जी-20 चं अध्यक्षपद भारताला मिळणं ही मोठी संधी आहे. यामुळे भारताला आपलं सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळाली आहे, विश्वात भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारताला आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत आहे. दरम्यान देशाचे आणि जी-20 संबंधित महत्वाचे निर्णय अधिवेशनात होतील. असं ते म्हणाले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून ते २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात सरकार कडून अनेक विधेयके मंजूर करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, जुनी पेन्शन योजना, आसाम-मेघालय सीमा वाद आदी मुद्द्यांवर सरकारला घेराव घालण्यात येणार आहे. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद उमटणार असून शिवसेना ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याच्या तयारीत आहे.

“मी सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि सभागृह नेत्यांना आवाहन करतो की, नवे किंवा तरुण खासदार यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि भावी पिढीला तयार करण्यासाठी त्यांना जास्त संधी द्यावी. त्यांचा सहभाग वाढला पाहिजे.सभागृहात होणारा गोंधळ, स्थगिती यामुळे खासदारांचं नुकसान होत असल्याचं मला अनेकांनी सांगितलं आहे. आम्हाल जे शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे त्यापासून आम्ही दूर राहतो अशी त्यांची खंत आहे. त्यामुळे सभागृहाचं काम चालणं महत्वाचं आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

या हिवाळी अधिवेशनात १६ विधेयके सादर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये डेंटल कमिशन विधेयक, राष्ट्रीय नर्सिंग आणि मिडवायफरी कमिशन विधेयक, मल्टिस्टेट सहकारी संस्था सुधारणा विधेयक, जुने अनुदान लिनियमन विधेयक, वन संरक्षण संशोधन विधेयक याचा समावेश आहे. संसदेच्या गेल्या अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीमध्ये होईल, असा दावा केला होता. मात्र, नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने हे हिवाळी अधिवेशन जुन्याच इमारतीमध्ये होणार आहे.

हे ही वाचा : 

‘दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही’, संजय राऊतांनी केला गंभीर आरोप

सीमा वादाचे पडसाद राज्यभर, औरंगाबादमध्ये युवा सेना आक्रमक

शिंदे आणि बोम्मई यांच्यात फोनवरून चर्चा, तरी बोम्मईंचा आडमुठेपणा कायम

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss