spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत नाहीतर चोक उत्तर दिल जाईल, शंभूराज देसाईंचा इशारा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Border issue) चिघळल्याने शिंदे सरकारवर षंढ अशी टीका करणाऱ्या संजय राऊत यांना सडेतोड उत्तर देण्यात आलंय. राऊत यांनी वापरलेल्या या शब्दाचा आम्ही तीव्र निषेध करतो. खुद्द संजय राऊत (Sanjay Raut) यांनाच बेळगाव कोर्टाचं समन्स होतं. तेव्हा न्यायालयाचं कवच असतानाही संजय राऊत तिथे का गेले नाहीत, मग षंढ कोण, असा प्रतिसवाल राऊत यांना विचारण्यात आलाय. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी हा सवाल केलाय.

सध्या राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra Karnataka Border Dispute) प्रश्न पेटला आहे. असं असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी तोंड आवरावं, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिलं जाईल, असं म्हणत देसाई यांनी राऊतांना इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यास आम्ही दोन हात करायला तयार आहोत, असं देसाई यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक वादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. केंद्रानं या प्रकरणात लक्ष घालावं. संजय राऊत यांची बोलण्याची पद्धत महाराष्ट्र सहन करणार नाही. संजय राऊतांना षंड बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा देसाई यांनी राऊतांना दिला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत जे वक्तव्य केले त्याचा मी धिक्कार करतो. केंद्राने या विषयात लक्ष द्यावं, समन्वय साधावा यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. असं असताना राऊतांनी ‘षंड’ शब्द वापरला. संजय राऊत यांनी स्वतःलढ्यात उतरा आणि मग मुख्यमंत्र्यांबाबत बोला, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

Delhi MCD Election Result 2022 दिल्लीच्या राजकारणात झाला मोठा बदल ! ‘आप’च्या ट्रान्सजेंडर उमेदवाराने केला काँग्रेस उमेदवाराचा पराभव

Delhi MCD Election Result 2022 दिल्लीत ‘आप’ची आघाडी, भाजपा-आपमध्ये जोरदार चुरस!

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss