spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून विनायक राऊत आणि सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक

सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक (Maharashtra and Karnataka) सीमावाद प्रचंड पेटला आहे. काल महारष्ट्रामधल्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिके (Kannada Rakshana Vedike) संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून तोड फोड करण्यात आली. या मुद्द्यावर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला. कर्नाटक सरकारवर टीका केल्यानंतर लोकसभेत (Lok Sabha) जोरदार खडाजंगी झाली.

महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. काल तर हद्दच झाली. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राचे लोक जाणार होते. पण त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र (Conspiracy) करण्यात आलं. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. काल महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. हे चालणार नाही. हा देश एक आहे. मी अमित शाह (Amit Shah) यांना विनंती करेन की त्यांनी यावर काहीतरी बोलावं, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. दरम्यान, सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर त्याला महाराष्ट्रातील इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनीही दुजोरा देत टीका करायला सुरुवात केली. कर्नाटकच्या या भूमिकेचा आणि वर्तनाचा आम्ही धिक्कार करतो, असं म्हणत महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अत्याचार, दडपशाही सुरू असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले. एका राज्याच्या मंत्र्यांना प्रवेश करण्यास मनाई केली जाते. अशी बंदी घालणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या अत्याचाराचा धिक्कार करत असल्याचे राऊत यांनी म्हटले. विनायक राऊत यांनी लोकसभेत हा मुद्दा मराठीत उपस्थित केला. महाराष्ट्राच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभेत मोठ्या प्रमाणत गदारोळ झाल्याचे दिसून आला.

हे ही वाचा : 

संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत नाहीतर चोक उत्तर दिल जाईल, शंभूराज देसाईंचा इशारा

Delhi MCD Election Result 2022 दिल्लीच्या राजकारणात झाला मोठा बदल ! ‘आप’च्या ट्रान्सजेंडर उमेदवाराने केला काँग्रेस उमेदवाराचा पराभव

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss