विशाखापट्टणम जिल्ह्यातील दुव्वाडा रेल्वे स्थानकावर बुधवारी एका २० वर्षीय विद्यार्थिनीला प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील अडकलेल्या अवस्थेतून तिचा बचाव करण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांमुळे आणि आरपीएफमुळे एक मोठी घटना वेळीच टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक सैनिकांचं जोरदार कौतुक करत आहेत.
हेही वाचा :
वंचितचे हाजी अस्लम सय्यद यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश
एमसीएच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी ती कॉलेजला जात होती आणि अण्णावरमहून दुव्वाडा येथे पोहोचली होती. विद्यार्थिनी आपल्या कुटुंबाला सोडायला स्टेशनवर असल्यामुळे ती ट्रेनच्या आत गेली आणि ट्रेन धावू लागल्यावर विद्यार्थी खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागली आणि दरम्यान तिचा पाय घसरल्याने ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकली. मुलीने घाबरून आरडाओरडा केल्याने गोंधळ उडाला. ट्रेन लगेच थांबली तरी. रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरीत प्रतिक्रिया देत मुलीला वाचवण्यासाठी उपाययोजना केल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ ट्रेन थांबवून मुलीची सुटका केली.
A student was slipped while deboarding Guntur-Raigad express train and got #Stuck in between the train and the platform, at #Duvvada rly stn. Appreciable job by #RailwayPolice , rescued the girl safely and shifted to the nearby hospital.#Visakhapatnam #AndhraPradesh #Vizag pic.twitter.com/wezF8Eb6wl
— Surya Reddy (@jsuryareddy) December 7, 2022
MCD निवडणुकीच्या विजयानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींचा घेतला आशीर्वाद, अन् म्हणाले
या धक्कादायक व्हिडिओतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे विद्यार्थिनीला फारशी दुखापत झाली नाही. हा व्हिडिओ @jsuryareddy नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला शेकडो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, स्वतःच पद उपमुख्यमंत्र्यांना केलं बहाल