spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gujarat Assembly Election 2022 Result गुजरात-हिमाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल जाहीर होणार, मतमोजणीला सुरुवात, गुजरातमध्ये भाजप ९० जागांवर आघाडी

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांचे निवडणूक निकाल (८ डिसेंबर) येणार आहेत. राज्यभरात उभारण्यात आलेल्या ३७ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. विधानसभेच्या १८२ जागांसाठी १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. त्याच वेळी, ५ डिसेंबरच्या संध्याकाळी, एक्झिट पोल समोर आले आणि त्यात भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळेच गांधीनगर येथील भाजपच्या राज्य मुख्यालय ‘कमलम’ येथे विजयोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. कमलमचे प्रवेशद्वार भव्यपणे सजवलेले आहे. याशिवाय कार्यकर्त्यांना निवडणूक निकाल पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : 

Salt on the fruit फळांवर मीठ घालून खाल्ल्यास आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मतमोजणी केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. १८२ सदस्यीय राज्य गुजरात विधानसभेसाठी बहुमताचा आकडा ९२ आहे. गुजरातमध्ये एकूण ६४.३३ टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात ६८ जागांसाठी मतदान झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. या दोन्ही राज्यात कोण सत्तेत येणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Thane News दिवेकरांची नवी मुंबईत समाविष्ट करण्याची मागणी, लिहलं आयुक्तांना पत्र

भाजप उमेदवार हार्दिक पटेल पुन्हा भाजपची सत्ता येईल असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. निश्चितपणे १३५-१४५ जागांवर भाजप सत्ता स्थापन करेल. भाजप कामाच्या जोरावर पुन्हा निवडुण येईल. गेल्या २० वर्षात येथे एकही दंगल दहशतवादी हल्ला झालेला नाही. लोकांना माहिती आहे की, भाजपने त्यांच्या अपेक्षा पुर्ण केल्या आहेत. त्यांनी भाजपलाच मतदान दिले आहे. कारण त्यांचे भविष्य सुरक्षित आहे.

गुजरातमध्ये भाजप ९० जागांवर पुढे

काँग्रेसनेही खातं उघडलं

Latest Posts

Don't Miss