spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा संजय राऊतांचा आरोप

राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या नवे सरकारच्या भवितव्या संबंधित विविध याचिका शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या.

मुंबई : राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या नवे सरकारच्या भवितव्या संबंधित विविध याचिका शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. परंतू या याचिकेवर कोर्टाने तात्पुरता परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याच दरम्यान शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी “सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय हे कोणत्याही खिशात असू शकत नाही” असे म्हटले आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणले, ” हे सरकार थोपवण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे लादले गेले आहे. संविधानानुसार हे सरकार स्थापन करण्यात आले नाही. या संदर्भात शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांनी राज्यपालांना पत्र दिले आहे. यात राज्यपालांनी इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये, असे लिहले आहे. 39 आमदारांवर कारवाईचे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याचा या पत्रात उल्लेख केला आहे. राज्यातील सरकार बेकायदेशीर असून मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ देखील बेकायदेशीर आहे. जर मंत्र्यांनी शपथ घेतली तर तो घटनाद्रोह होईल, असे राऊत यावेळी म्हणाले. तर दुसरीकडे शिंदे गटाला दिलासा मिळाला असे म्हणणे चुकीचे आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे”. असेही राऊतांनी सांगितले.

हेही वाचा : 

सकाळचा नाश्ता लवकर होण्यासाठी वापरून पहा या टीप्स

Latest Posts

Don't Miss