spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘सिंघम अगेन’मध्ये ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार ‘लेडी सिंघम’च्या भूमिकेत

सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) हा चित्रपट बनवणार आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण 'सिंघम अगेन'मध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे.

Singham Again : सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) ‘सिंघम अगेन’ (Singham Again) हा चित्रपट बनवणार आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘सिंघम अगेन’मध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पहिल्यांदाच एका चित्रपटात लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित शेट्टीने यापूर्वी दीपिका पदुकोणबरोबर २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ (Chennai Express) या चित्रपटात काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

दीपिका पदुकोण कॉप युनिव्हर्समध्ये लेडी कॉपच्या भूमिकेत येणार आहे. दीपिका पदुकोणबरोबर ‘सिंघम अगेन’मध्ये काम करणार अशी माहिती स्वत: रोहित शेट्टीने आज मुंबईत त्याच्या आगामी ‘सर्कस’ (Cirkus) या चित्रपटातील ‘करंट लगा रे’ या गाण्याच्या लाँचच्या वेळी केली. २०११ मध्ये अजय देवगणने ‘सिंघम’ या चित्रपटाद्वारे कॉप युनिव्हर्सची सुरुवात केली. यामध्ये अजय देवगणने बाजीराव सिंघमची भूमिका साकारली आणि तो देशभर लोकप्रिय झाला. २०१४ साली ‘सिंघम रिटर्न्स’ हा चित्रपट आला होता. यामध्ये अजयसोबत करीना कपूर खान दिसली होती. मात्र, या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेत्री दिसणार असल्याची ही पहिलीच वेळ आहे.

दीपिका पदुकोणबरोबर पुन्हा काम करण्याबाबत रोहित शेट्टी म्हणाला, “सगळ्यांना माहीत आहे की मी दिग्दर्शित केलेल्या आगामी चित्रपटाचे नाव ‘सिंघम अगेन’ आहे. मी कधीही लेडी सिंघमची ओळख करून दिली नाही. त्यामुळे आज मी तुम्हाला सांगतो की दीपिका पदुकोण ‘सिंघम अगेन’मध्ये लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका माझ्या कॉप युनिव्हर्सची बॉम्बशेल आहे. आम्ही पुढच्या वर्षी या चित्रपटावर काम सुरू करू.” रोहित शेट्टीने दीपिकाबरोबर ‘सिंघम अगेन’मध्ये काम करण्याची घोषणा करताच दीपिकाने रोहित शेट्टीला स्टेजवर मिठी मारली आणि धन्यवाद म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

 दीपिका पदुकोण या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक आहे. नवीन प्रोजेक्टबद्दल सांगताना दीपिका म्हणाली, “रोहित शेट्टीच्या चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटाने मला एक लोकप्रिय व्यक्तिरेखा दिली. मला नेहमीच त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती.” चेन्नई एक्सप्रेसनंतर रोहित शेट्टी आणि दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा या चित्रपटात काम करणार आहेत. चेन्नई एक्सप्रेसने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

२३ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘सर्कस’ चित्रपटातील ‘करंट लगा रहे’ या गाण्यात रणवीर आणि दीपिका एकत्र नाचताना दिसणार आहेत. या गाण्याच्या लाँचिंगला रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दोघेही उपस्थित होते. गाण्याच्या लॉन्च प्रसंगी रणवीर आणि दीपिकाने ‘करंट लगा रे’ या गाण्याचं वैशिष्ट्य सांगण्याबरोबरच या गाण्यावर जोरदार डान्सही केला आणि खूप धम्माल केली.

दीपिका पदुकोणच्या इतर प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर तिच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. ती लवकरच शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे शाहरुख खानचा ‘जवान’, हृतिक रोशनचा ‘फाइटर’ आणि प्रभासचा ‘प्रोजेक्ट के’ हा आणखी एक चित्रपट आहे. याशिवाय ती रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग यांच्या ‘सर्कस’ या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे.

हे ही वाचा:

घटस्फोटानंतर हनी सिंग पुन्हा एकदा पडला प्रेमात! व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Gujarat Election 2022 Results निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इंटरनेटवर मिम्सचा पाऊस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss