spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुर्मूंना पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही, शिवसेनेच्या भूमिकेवर बाळासाहेब थोरातांची नाराजी

शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही.

मुंबई : शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही. अशी माहिती काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

थोरात म्हणाले की, “राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार? असे मत बाळासाहेब थोरात यांनी मांडले.

हेही वाचा : 

मध्य प्रदेशसाठी दाखवलेली तत्परता महाराष्ट्रासाठी का नाही ? नाना पटोलेंचा सवाल

शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही. थोरातांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा संजय राऊतांचा आरोप

Latest Posts

Don't Miss