spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१७ डिसेंबरला महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात मुंबईत मोर्चा – मविआ 

काही दिवसांपूर्वी माविआ मधल्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या १७ डिसेंबरला केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. तर आज पुन्हा एकदा माविआ नेत्यांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते नाना पटोले हे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेतून माविआच्या नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
येत्या १७ तारखेला महाराष्ट्रद्रोहींच्या विरूद्ध हल्लाबोल असा हा महाप्रचंड अतिविराट मोर्चाची सुरुवात होईल असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले. हा मोर्चा जिजामाता उद्यानापासून सुरु होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत होईल असेही ते म्हणाले. ज्याप्रमाणे सातत्याने महाराष्ट्राचा अपमान केला जातोय. महाराष्ट्राचं जणू काही अस्तित्व नाकारण्यात येत आहे. एका बाजूने महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय. या संदर्भातील अनेक मुद्दे मोर्चात घेतले जाणार आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे? कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य ही हिंदुस्तान-पाकिस्तान आहेत का?”, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले. “महाविकास आघाडीचे सर्व मित्रपक्ष आणि वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित आहेत. ५ डिसेंबरला इथे पत्रकार परिषद झाली होती. ७ डिसेंबरला महामोर्चाबद्दल चर्चा करण्याचं ठरलं होतं. त्यानुसार चर्चा झाली”, असं अजित पवारांनी सांगितलं. “आजच्या बैठकीचा हेतू अजित पवारांनी सांगितलं आहे. परवाची बैठक ही धावपळीची झाली आणि आम्ही मोजकेच लोकं उपस्थित होतो. आज मात्र महाविकास आघाडीचे सर्व घटक, मित्रपक्ष उपस्थित आहेत. १७ डिसेंबरला महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात हल्लाबोल करण्यासाठी प्रचंड, अतिविराट मोर्चा निघणार आहे”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

हे ही वाचा : 

Himachal Election Result 2022: हिमाचलवर काँग्रेसचा कब्जा, विजयी उमेदवारांच्या यादीसह राहुल गांधी काय म्हणाले घ्या जाणून

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत मारला टोला

गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही – शरद पवार

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss