spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गुजरातमध्ये BJPच्या विजयानंतर फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री देखील निश्चित झाले आहे. या विजयामुळे भाजपमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री देखील निश्चित झाले आहे. या विजयामुळे भाजपमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत २७ वर्षांच्या सत्तेनंतरही सरकारविरोधी जनमताचे सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपा पुन्हा ऐतिहासिक विजयासह सत्तेत येताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये प्रचारासाठी गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

फडणवीसांनी या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रेय दिलं. तसेच आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपा १७५ च्या आसपास जागा जिंकत असल्याचं म्हटलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये एक इतिहास उभा केला आहे. आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून भाजपाने १५७ च्या जवळपास जागा जिंकल्या आहेत. हा ऐतिहासिक आणि अपेक्षित निकाल आहे. २७ वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरे गेली. विरोधी पक्षांना वाटलं २७ वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र, या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं मी म्हटलं होतं. ते निकालातून दिसलं.” “लोकांनी मोदींवर आणि भाजपावर पूर्ण विश्वास टाकला आहे. काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ १६ ते १७ जागा मिळताना दिसत आहे. हा त्यांचा आतापर्यंतचा निचांक आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “ज्यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही घोषित केला होता असा आप नावाचा पक्ष तोंडावर आपटला आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी एका टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीत त्यांना किती जागा मिळणार हे लिहून दिलं होतं.” “त्या किती जागा होत्या त्या त्यांना आणि त्या टीव्ही चॅनलला माहिती आहे. परंतु, आजच्या निकालाने अरविंद केजरीवाल दिल्लीचे नेते आहेत आणि दिल्लीच्या बाहेर ते नेते नाहीत आणि त्यांचा पक्षही नाही हे दाखवून दिलं आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणीसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं. दरम्यान आप दिल्लीपुरत मर्यादीत हे गुजरातने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मी गुजरातच्या जनतेचं अभिनंदन करतं. मी गुजरातला प्रचारासाठी गेलो होतो. त्यावेळीच गुजरातचा कल लक्षात आला होता. निवडून आलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन, असंही फडणवीस यांनी म्हटलं.

विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी ही घोषणा केली आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. भाजपनं या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्या आहेत.

हे ही वाचा : 

Himachal Election Result 2022: हिमाचलवर काँग्रेसचा कब्जा, विजयी उमेदवारांच्या यादीसह राहुल गांधी काय म्हणाले घ्या जाणून

१७ डिसेंबरला महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात मुंबईत मोर्चा – मविआ 

संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतांना, खासदार अमोल कोल्हे त्यांचा माईक केला बंद

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss