spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gujarat Election Result 2022 गुजरातमध्ये भाजपचा नवा विक्रम, ५३ टक्के मतांवर कब्जा

गुजरात विधानसभेचा निकाल भाजपसाठी ऐतिहासिक असाच ठरला असून भाजपने सर्व जुने विक्रम मोडून तब्बल १५७ जागांवर विजय मिळवला आहे. मतांच्या टक्केवारीचेही जुने विक्रम मोडत भाजपने तब्बल ५३ टक्के मतं मिळवली आहेत.

गुजरात विधानसभेचा निकाल भाजपसाठी ऐतिहासिक असाच ठरला असून भाजपने सर्व जुने विक्रम मोडून तब्बल १५७ जागांवर विजय मिळवला आहे. मतांच्या टक्केवारीचेही जुने विक्रम मोडत भाजपने तब्बल ५३ टक्के मतं मिळवली आहेत. भाजपला मिळालेल्या या मोठ्या विजयानंतर राजकीय विश्लेषकांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं नव्हतं. तसेच काँग्रेसला या निवडणुकीत फक्त १६ जागा तर आम आदमी पक्षाला आतापर्यंत केवळ ५ जागांवर विजय मिळवता आला.

भाजपने यंदाच्या निवडणुकीत या आधीचे सर्व जुने विक्रम मोडले आणि तब्बल ५३ टक्क्यांहून अधिक मतं मिळवली. २००२ सालच्या निवडणुकीत ४९.८५ टक्के, २००७ साली ४९.१२ टक्के आणि २०१२ साली ४७.८५ टक्के मतदान भाजपने मिळवले होते. यंदा त्यापेक्षा अधिक मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपली मतं टाकली.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण करत ७७ जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला केवळ १७ जागांवर यश मिळवता आलं आहे. सन १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तब्बल १४९ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसचा हा विक्रम यंदा भाजपने मोडीत काढला आहे. यंदाच्या निकालानंतर काँग्रेसला राज्यातील विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे.

सन २००१ साली मोठ्या राजकीय घडामोडींनंतर भाजपने नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर २००२ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने १२७ जागांवर विजय मिळवला होता. त्या आधी १९९८ साली भाजपला ११७ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपने त्यांच्या हा जुना विक्रम मोडला असून १५७ जागा मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे. सन २००२ सालच्या निवडणुकीनंतर भाजपने गुजरात मॉडेलच्या आधारे आणि त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकल्या, पण भाजपच्या जागांमध्ये सातत्याने घट होताना दिसली. सन २००७ साली भाजपला ११७ जागा मिळाल्या, त्यानंतर २०१२ साली ११५, जागा मिळाल्या. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर २०१७ साली झालेल्या गुजरात निवडणुकांमध्ये भाजपच्या जागा शंभरीच्या आत आल्या. त्यावेळी भाजपला ९९ जागा मिळाल्या होत्या.

गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी एकूण ३० सभा घेतल्या होत्या. याचा फायदा भाजपला झाला. १९९५ पासून सलग २७ वर्षे भाजप येथे सत्तेत आहे. काँग्रेसला येथे पुन्हा सत्तेत येता आलेलं नाही. काँग्रेस पक्ष यंदाच्या निवडणुकीत आणखी मागे पडलाय. येथे आप भाजपला आव्हान देईल असं बोललं जात होतं. पण तसं झालेलं नाही. आपला देखील येथे काही खास कामगिरी करता आलेली नाही.

गुजरातमध्ये मिळालेल्या विजयानंतर भाजपकडून जल्लोष (BJP Celebration) केला जात आहे. कारण गुजरातमध्ये जर भाजपला अपेक्षित मत मिळालं नसतं तर त्याचा थेट संदर्भ हा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाशी जोडला गेला असता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देखील याचा फटका भाजपला बसला असता.मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होणार आहे.

हे ही वाचा : 

गुजरातमध्ये BJPच्या विजयानंतर फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Himachal Election Result 2022: हिमाचलवर काँग्रेसचा कब्जा, विजयी उमेदवारांच्या यादीसह राहुल गांधी काय म्हणाले घ्या जाणून

संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतांना, खासदार अमोल कोल्हे त्यांचा माईक केला बंद

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss