spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाईजान करतोय ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीला डेट ?

बॉलिवूडचा भाईजान आशी ओळख असणाऱ्या सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो.

Salman Khan, Pooja Hegde : बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. मॉडेल लुलिया वंतूरचं नाव अनेकदा सलमानसोबत जोडलं गेलं. सलमानच्या पार्ट्यांना आणि कौटुंबिक कार्यक्रमांनाही तिची हजेरी पाहिली गेली. मात्र सलमान लुलियाच्या नाही तर एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याचं कळतंय. ही अभिनेत्री फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे. प्रभास, अल्लू अर्जुन, रामचरण, नाग चैतन्य, महेश बाबू यांसारख्या साऊथ सुपरस्टार्ससोबत तिने काम केलंय.

सध्या एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत सलमान खानचं नाव जोडलं जात आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) ही सध्या सलमान खानला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. या दोघांच्या नात्याबाद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सलमानचं याआधी अनेक अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं. यातील काही नाती अत्यंत वाईट वळणावर येऊन तुटली. गेल्या काही वर्षांपासून तो अनेकदा लुलियासोबत दिसला. मात्र एक चित्रपट समिक्षकाने ट्विट करत सलमानच्या या नव्या प्रेमाविषयी मोठा खुलासा केला आहे.

फिल्म इंडस्ट्रीतील गॉसिप देणाऱ्या उमैर संधूने याविषयी ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्याने लिहिलं, ‘ब्रेकिंग न्यूज- बीटाऊनमध्ये नवीन जोडी आली आहे. मेगास्टार सलमान खानला पूजा हेगडेवर प्रेम जडलंय. सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसने पूजासोबत दोन चित्रपटसुद्धा साइन केले आहेत. सध्या हे दोघं एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवत आहेत. या गोष्टीला सलमानच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने दुजोरा दिला आहे.’ ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये सलमान आणि पूजाची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तसेच काही आगामी चित्रपटांमधून पूजा आणि सलमान हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

 सलमानचे आगामी चित्रपट –

सलमान हा ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाबरोबरच किक-2 आणि नो एंन्ट्री या सिक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच सलमान शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटामध्ये एक छोटी भूमिका साकारणार आहे. सलमानच्या टायगर-3 या चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

 पूजाचे आगामी चित्रपट –

पूजा ही रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पूजाच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिनं हृतिक रोशनच्या मोहनजोदाडो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्पण केलं पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर तिनं हाऊसफुल-4 मध्ये प्रमुख भूमिका साकारली. तिच्या दुवदा जगन्नाथम, साक्षीम, बीस्ट, मुगामुदी या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

हे ही वाचा : 

Christmas 2022 : कशा पद्धतीने साजरा केला जातो ख्रिसमस, घ्या जाणून

गुजरात निवडणूक ठरली ‘आप’ साठी फायदेशीर ! जाणून घ्या कसा मिळतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss