spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

४८ तास थांबून, शरद पवार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं?, निलेश राणेंचा खोचक सवाल

महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सुरू असलेल्या सीमावादाकडे केंद्र सरकार मूक प्रेक्षक राहून चालणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते. एका सभेला संबोधित करताना पवार म्हणाले, सत्तेचा दुरुपयोग करून भाषा माध्यम आणि चळवळीचा विचार नष्ट केला तर त्याची प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. मात्र केंद्राने याकडे डोळेझाक केली आहे. याप्रकरणी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला दोन दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी हा इशारा दिला होता, त्याचं काय झालं, असा सवाल करत भाजप नेत्याने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्न चिघळला असून केंद्र सरकार किंवा महाराष्ट्रातील भाजप यावर काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवार यांना असा खोचक प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा : 

भाईजान करतोय ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीला डेट ?

निलेश राणे यांनी ०९ डिसेंबरला एका ट्विटद्वारे शरद पवारांना प्रश्न विचारात म्हणाले, “ते पवार साहेब ४८ तास थांबून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं? असे राणे यांच्याकडून विचारण्यात आले. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागंलय.

शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप कारवाई करणार?, पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर उदयनराजे भोसले म्हणाले

येत्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात होणारे हल्ले थांबले नाहीत तर महाराष्ट्राने आतापर्यंत राखून ठेवलेल्या संयमाची जागा वेगळी गोष्ट घेऊ शकते. मग त्यानंतर जे काही होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

REALME 10 Pro + 5G आणि REALME 10 Pro 5G ची भारतात एन्ट्री

Latest Posts

Don't Miss