spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sulochana Chavan passes away जेष्ठ लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

मराठी मनोरंजन विश्वाची चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. ६० वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती.

मराठी मनोरंजन विश्वाची चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. ६० वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांची प्रकृती गेली काही दिवस खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज शनिवार १० डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही महिन्यांपूर्वी त्या घरात पडल्या होत्या. त्यांच्या कमरेचं हाड मोडलं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्या तेव्हापासून एकाच जागेवर होत्या. शिवाय वयामुळेही प्रकृती खालावली होती. गेल्या काही दिवसात त्यांची प्रकृती अहडीक चिंताजनक होती. त्यांच्या स्मृतीही कमजोर होत होत्या. त्यावर इलाज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने त्या घरीच होत्या. अखेरी शनिवारी गीरगाव येतील राहत्या घरीच त्यांचे निधन झाले. अशी माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली.

सोळावं वरीस धोक्याचं.. उसाला लागलं कोल्हा.. आंबा आलाय पाडला, पावणा ;पुण्याचा आलाय गं.. अशा शेकडो लावण्या ज्यांनी अजरामर केल्या असा संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज आज हरपला. काही महिन्यांपूर्वीच त्यांना भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यावेळीच त्यांची प्रकृती काहीशी ठीक नसल्याने त्यांना व्हील चेअर वरून आणण्यात आले होते.

लावणी आणि सुलोचना ताईंचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. त्यांच्या पार्थिवावर वाजता आज ३ वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावलेली होती.

हे ही वाचा : 

Ashok Kumar : ‘दादामुनी’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अशोक कुमार यांची आज पुण्यतिथी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss