spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ईशान किशनने तोडला एक दिवसीय क्रिकेटचा सर्वात मोठा विक्रम

बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध भारत (India) संघात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करणाऱ्या भारतासाठी हा ‘करो वा मरो’ सामना आहे. झहुर अहमद चौधरी स्टेडिअम, चट्टोग्राममधील या सामन्यात मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ओळख असणाऱ्या भारताच्या सलामीवीराने खास विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, कमी वयात अशी कामगिरी करणारा भारताचा चौथा क्रमांकाचा खेळाडू बनला. या यादीत सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि यांचाही समावेश आहे.

बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या १३१ चेंडूत २१० धावांची खेळी करत इतिहास रचलाय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरलाय. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर होता. त्यानं २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १३८ चेंडूत २०० धावांचा शिखर गाठला होता. मात्र, बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशननं विक्रमी द्विशतक ठोकून जगासमोर आपली गुणवत्ता सिद्ध केली.

बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवन आणि ईशान किशन हे मैदानावर उतरले होते. यावेळी धवन ३ धावांवर तंबूत परतला. मात्र, किशन खेळपट्टीवर टिकून राहिला आणि संघासाठी धावा काढल्या. सध्या भारतीय संघ मजबूत स्थितीत असून विराट कोहलीने देखील शतक झळकावले. त्याने एकदिवसीयमध्ये ७२ वे शतक झळकावले. यावेळी त्याने ८६ चेंडूत १०४ धावा केल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ११ चौकारही मारले. हे त्याचे आतापर्यंतचे चौथे अर्धशतक होते. या अर्धशतकासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. किशन हा बांगलादेशमध्ये अर्धशतक करणारा युवा भारतीय सलामीवीर ठरला. त्याने हे अर्धशतक २४ वर्षे आणि १४५ दिवसांच्या वयात ठोकले. यासह त्याने या यादीत दुसरे स्थान गाठले. या यादीत अव्वलस्थानी गौतम गंभीर असून त्याने २१ वर्षे आणि १८४ दिवसांच्या वयात बांगलादेशमध्ये अर्धशतक झळकावले होते. तसेच, या यादीतील तिसऱ्या क्रमांकावर विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग असून त्याने २४ वर्षे आणि १७३ दिवसांच्या वयात बांगलादेशमध्ये अर्धशतक केले होते.

हे ही वाचा : 

Sulochana Chavan रसिक प्रेक्षकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांचा गायन प्रवास

४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उदघाटनात उद्धव ठाकरेंनी साधला सत्ताधारी पक्षांवर निशाणा

वसंत मोरेंनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट, पक्ष सोडण्याच्या चर्चेवर पूर्णविराम

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss