spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्णत्वास नेणे आव्हानात्मक होते. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची समजूत घालून महामार्ग पूर्णत्वास नेला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समृद्धी महामार्गाची एकत्र पाहणी केली.

एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाच्या माझा काट्यावर समृद्धी महामार्गवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि मी एमएसआरडीसी मंत्री असताना या प्रकल्पावर काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी मुंबई-नागपूर हा १५ तासांचा प्रवास काही तासांवर आणण्यासाठी काम सुरू करण्यात आले. बाळासाहेबांच्या संकल्पनेतून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे (Mumbai-Pune Expressway) साकार झाला. त्यानंतर या ७५० किमीच्या मुंबई-नागपूर महामार्गाला त्यांचे नाव देण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. जेएनपीटीपासून ते नागपूर प्रवासासाठी तीन तीन दिवस लागत होते. हा वेळ वाचणार आहे. मालवाहतूक करणारे ट्रक आणखी लवकर पोहचतील. त्याशिवाय, शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचे मन कसे वळवले ते सांगितलं. प्रकल्पाला ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होता. त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटलो. त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांची अडचण समजून घेतली. संवाद साधत यातून मार्ग काढण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. या ठिकाणी काही खूप अडचणी आल्यात. त्यातून मार्ग काढला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांची समजूत काढताना त्यांनी मिळालेल्या मोबदल्यातून इतर ठिकाणी शेतजमिन व त्याला पूरक व्यवसाय करता येईल, याची माहिती दिली. त्यानंतर प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी इतर ठिकाणी शेती घेत, त्यातून विकास सुरू केला. तर, काहींनी दुकाने, इतर व्यवसाय सुरू केले. या प्रकल्पामुळे सर्वसामान्यांकडे समृद्धी आली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर अजित पवारांची जोरदार टीका

Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg : नेमका कसा आहे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग ?

ईशान किशनने तोडला एक दिवसीय क्रिकेटचा सर्वात मोठा विक्रम

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss