spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाण्यातील आंबेडकर चळवळीतले अॅड. दीपक गायकवाड यांचा ठाकरे गटात प्रवेश

काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात नेते आणि कार्यकर्त्यांकडून बंड करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेनेत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणत पक्ष प्रवेशात सुद्धा वाढ झाली आहे. आज आंबेडकरी चळवळीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेगटात प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत विरोधकांवर तोफ डागलीय. राज्यपाल कोश्यारींच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानाचाही समाचार घेतलाय.

ठाण्यातील (Thane) आंबेडकर चळवळीतले अॅड. दीपक गायकवाड (Deepak Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाने आज ठाण्यातील युवांचा मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनाभवनात (Shiv Sena Bhavana) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. ‘मी म्हणजे शिवसेना, मी म्हणजे सगळं काही असं नाही. काही जणांना वाटतं शिवसेना संपली अशी वाटतं मात्र काही जण शिवसेना स्वतःला समजत होते. ते आता संपले आहे. महाराष्ट्रद्रोहींच्या विरोधात हा मोर्चा आहे. महाराष्ट्राची अवहेलना होते. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अपमान करणारा माणूस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला बसला, त्यामुळे महाराष्ट्राने नेमकं समजायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला.

एका बाजूला महाराष्ट्र-कर्नाटकचा (Maharashtra-Karnataka) सीमावाद पेटला आहे. पण महाराष्ट्राच्या बाजूने कुणीच बोलणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री मस्तीत आणि माज आल्यासारखे बोलत आहे. पण आमचे मुख्यमंत्री हे स्क्रिप्ट लिहून दिल्यासारखे वाचत आहे. कोर्टात याचिका दाखल केलेली असताना तसं त्यांनी बोललं पाहिजे. त्यांना सोलापूर पाहिजे, अक्कलकोट पाहिजे, इतकी हिंमत होती कशी. केंद्रात भाजपचे सरकार आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये मिंधे असले तरी भाजपचेच सरकार आहे. दोन्ही नेत्याचे एकच नेते आहे. आपल्या मिंध्याचे नेते एकेकाळी बाळासाहेब होते, आता कोण मोदी आहे. बोम्मईंचा नेता मोदी आहे मग ते इतक्या जोरात बोलताय, मग हे गप्प का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. पंतप्रधान येऊन गेले काही जण बोललो मी होतो म्हणूनच झालं असं नसतं. आजपर्यंत महाराष्ट्रात कितीतरी मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राचा मोर्चा महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात असणार आहे. हा १७ तारखेला महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा आहे, असंही ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : 

#SuperFastCM ट्विटरवर हॅशटॅग ‘सुपरफास्ट सीएम’चा ट्रेंड बनावट?

Dilip Kumar दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडलेल्या त्या नायिकांचे किस्से, तुम्हाला माहित आहे का?

परभणीत स्कूल बस व एसटी बसची समोरासमोर धडक, २० जण गंभीर जखमी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss