spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तुम्हाला Protein bar या पदार्थाची रेसिपी माहित आहे का? जाणून घ्या मग

थंडीच्या काळात शरीराला ऊर्जेची खूप गरज असते. त्यामुळे थंडीच्या काळात फळ, हिरव्या पालेभाज्या काजू बदाम पिस्ता अश्या गोष्टीचा समावेश जास्त प्रमाणात करतो. तसेच शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून थंडीच्या काळात डिंकाचे, खजुरचे , मेथीचे लाडू घरी बनवले जातात. लाडू पेक्षा सोपी रेसिपी देखील आपण घरी बनवू शकतो. बाजारात मिळणारे प्रोटीन बार हे खूप महागडे असतात पण आपण ते आता घरी देखील बनवू शकतो. तसेच प्रोटीन बार हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लोकांना आवडते. तसेच शरीरासाठी ऊर्जेसोबत प्रोटीनची देखील गरज असते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून प्रोटीन बार (Protein bars) ही रेसिपी कशी बनवायची या बद्दल सांगणार आहोत.

साहित्य :

ओटस १ वाटी
खजूर १ वाटी
काजू १ वाटी
बदाम १ वाटी
पिस्ता
अक्रोड (अर्धी वाटी)
तीळ (पाव वाटी)
खोबऱ्याचा कीस
मध (अर्धी वाटी)
वेलची पावडर (अर्धा चमचा)
तूप १ चमचा

 

कृती :

सर्व प्रथम कढई मध्ये बदाम (Almonds) , काजू (nuts), पिस्ता (Pistachio), अक्रोड (Walnuts), घालून घेणे आणि चांगले भाजून घेणे.
मिश्रण चांगले गार झाल्यानंतर मिक्सर मध्ये मध्यम आकारात वाटून घ्या.
नंतर कढईत तीळ (mole) आणि बारीक किसलेले खोबरे घालून चांगले परतवून घेणे.
मिश्रण चांगले परतवून झाले कि त्या मिश्रणामध्ये खजूर घालून घ्या.
खजूर मिश्रण चांगले परतवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडे मध तूप घालून घ्या आणि मिश्रण चांगले एकत्रित करून घ्या.
त्यानंतर ओट्स भाजून मिक्सकर मध्ये बारीक वाटून घ्या आणि तयार केलेल्या मिश्रणामध्ये घालून घ्या आणि त्याचे बारीक बारीक वड्या तयार करून घ्या. आणि खाण्यासाठी प्रोटीन बार तयार आहे. ही रेसिपी तुम्ही कधीही बनवू शकता, थंडीच्या दिवसात शरीराला प्रोटीनची आणि विविध गुणधर्माची गरज असते. त्याचप्रमाणे तुम्ही नियमितपणे थंडीच्या दिवसात सुकामेवाचे सेवन केले तर आरोग्याला अनेक फायदे होतील.

हे ही वाचा:

८ तास झोप, उपयुक्त आहार घेऊनही तुम्हाला थकवा जाणवतो?, तर “ही” असू शकतात गंभीर आजाराचे लक्षणे

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

 

Latest Posts

Don't Miss