spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Christmas 2022 नाताळ सणात विशेष महत्व असलेला ‘ख्रिसमस ट्री’चा जाणून घ्या इतिहास

Christmas Festival 2022 : संपूर्ण जगात सर्वात मोठ्या लोकसंख्येमध्ये साजरा होणारा सण म्हणजे ख्रिसमस, त्यालाच भारतीय उपखंडात नाताळ या नावाने ओळखले जाते. नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती सण आहे. हा सण दर वर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ह्या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. काही ठिकाणी हा सण ६, ७ किंव्हा १९ जानेवारी ला एपिफानी म्हणून साजरा करतात. हा सण १२ दिवसांचा असून ख्रिसमस्टाईड पर्वाची सुरुवात होते. जगभरात हा सण साजरा होतो. काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो. तर काही ठिकाणी संध्याकाळी हा सण साजरा केला जातो.

 

प्रत्येक वर्षी २५ डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा वाढदिवस म्हणून ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम (Bethlehem) मध्ये झाला. त्याच्या आईचे नाव मरीया आणि वडिलांचे नाव योसेफ होते. या दिवशी कॅथलिक लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि चर्च सजवून टाकतात. ख्रिसमस हा भारतातील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, ख्रिसमस हा सण वेगवेगळया नावानी देशात ओळखला जातो. ख्रिसमस हा सण भारतात आणि बाकीच्या देशात देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

तसेच ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्री देखील सजवला जातो. ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्रीला खूप महत्व आहे. त्यादिवशी ख्रिसमस ट्री म्हणजे एका झाडाला सजवले जाते. ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्री म्हणून ख्रिसमस हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ही परंपरा जर्मनी (Germany) पासून सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये मुलाला इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिलांनी त्यांना एक झाड भेट वस्तू म्हणून दिले असते. तसेच असे म्हटले जाते की येशूचा जन्म झाला त्यादिवशी सर्व देवांनी आनंद व्यक्त करण्यासाठी झाडांना सजवले होते. त्यामुळे ख्रिसमस Christmas 2022 या सणाच्या दिवशी ख्रिसमस ट्री Christmas tree सजवले जाते आणि हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

हे ही वाचा:

Christmas 2022 : कशा पद्धतीने साजरा केला जातो ख्रिसमस, घ्या जाणून

Latest Posts

Don't Miss