spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, निर्भया पथकाच्या गाड्या बंडखोर आमदारांच्या ताफ्यात

आज समृद्धी महामार्गाच्या ( (Samruddhi Mahamarg)) उदघाटना साठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उपस्थित होते. आणि या वेळी मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया फंडातून (Nirbhaya Fund) खरेदी करण्यात आलेली वाहनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थक आमदारांच्या सुरक्षितेसाठी वापरण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटाच्या सर्व आमदारांना व्ही दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेली वाहनं आमदारांच्या सुरक्षिततेसाठी वापरली जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपसह शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

या घटनेचा खुलासा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बातमीची काही कात्रणं शेयर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईत महिलांची सुरक्षा करण्यासाठी निर्भया फंडातून ३० कोटी रुपये मंजुर करण्यात आले होते. त्यातून मुंबई पोलिसांनी २२० बोलेरो, ३५ एर्टीगा, ३१३ पल्सर आणि २०० अॅक्टीव्हा खरेदी केल्या होत्या. त्यानंतर या गाड्यांच्या तुकडीचा समावेश मुंबई पोलिसांच्या ताफ्यात करण्यात आला होता.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षेसाठी असणाऱ्या ४७ बोलेरो गाड्यांचा वापर करण्यात आला. त्यातील १७ गाड्या मुंबई पोलीस दलाला परत करण्यात आल्या होत्या. परंतु अजूनही ३० गाड्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या सुरक्षेत तैनात असल्याची माहिती समोर आली आहे. निर्भया निधी महिलांची सुरक्षितता, महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारनं तयार केलेला होता. या निधीतून पोलिसांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून वाहने खरेदी केली गेली. मात्र खरेदी केलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

हे ही वाचा : 

ठाण्यातील आंबेडकर चळवळीतले अॅड. दीपक गायकवाड यांचा ठाकरे गटात प्रवेश

#SuperFastCM ट्विटरवर हॅशटॅग ‘सुपरफास्ट सीएम’चा ट्रेंड बनावट?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss