spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिमाचलमध्ये सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

काही दिवसांपासुर्वी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीने एकहाती सत्ता मिळवली तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस ने. काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी रविवारी हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याशइवाय मुकेश अग्निहोत्री (Mukesh Agnihotri) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रविवारी दुपारी शिमलामधील रिज मैदानात दुपारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (Himachal Pradesh Governor Rajendra Vishwanath Arlekar) यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. सुखविंदर सुक्खू यांनी शपथ घेताच महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचे निकाल परवा हाती आले. भाजपने गुजरातमध्ये ऐतिहासिक १५६ जागा जिंकल्या. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६८ जागा आहेत. परवा झालेल्या मतमोजणीनंतर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं. काँग्रेसने ४० जागा जिंकल्या. दुसरीकडे भाजपला २५ जागा जिंकता आलेल्या आहेत. तर २ ठिकाणी इतरांना संधी मिळाली.

आज हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सुक्खू यांनी शपथ घेतली. ते हिमाचलचे पंधरावे मुख्यमंत्री असतील. शपथ घेताच सुक्खू यांनी जुन्या पेन्शन योजनेवरुन महत्त्वाचं विधान केलंय. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल, आता राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेणार आहे. त्यानंतर जेवढी आश्वासनं दिली त्याची पूर्तता करण्याची प्रयत्न करणार आहोत, असं सुक्खू म्हणाले. विशेष म्हणजे पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, निवडणुकांचे कल येताच प्रतिभा सिंह यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांचं हिमाचल प्रदेशमध्ये वर्चस्व होतं. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांच्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी दिली. त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असून त्यांच्याच नेतृत्वामध्ये काँग्रेसने घवघवीत यश प्राप्त केलं.

हे ही वाचा : 

एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप, निर्भया पथकाच्या गाड्या बंडखोर आमदारांच्या ताफ्यात

ठाण्यातील आंबेडकर चळवळीतले अॅड. दीपक गायकवाड यांचा ठाकरे गटात प्रवेश

#SuperFastCM ट्विटरवर हॅशटॅग ‘सुपरफास्ट सीएम’चा ट्रेंड बनावट?

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss