spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BEST Premium Bus बीकेसी ते ठाणे ‘बेस्टची प्रीमियम बस’सेवा सोमवारपासून होणार सुरू

मुंबईकरांना (Mumbai) दर्जेदार आणि परवडणारी बससेवा देण्यासाठी ‘बेस्ट’ (Best Bus) प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बेस्टमधील बसेसची वाढलेली संख्या आणि कमी भाडे, तसेच वातानुकूलित सुविधांची उपलब्धता यामुळे प्रवाशांचा बेस्टकडे (Best Premium Bus) कल वाढला आहे. कडे जात आहे या मालिकेत आता प्रीमियम बससेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला असून सोमवारपासून (१२ डिसेंबर २०२२) कुर्ला ते ठाण्यापर्यंत ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी दिली.

हेही वाचा : 

शिंदे विरुद्ध ठाकरे, केंद्रीय निवडणूक आयोगात आजपासून खरी लढाई सुरू, संपूर्ण राज्याचे लक्ष

समोर आलेल्या माहितीनुसार सोमवार ते शनिवार अशी ही सेवा असणार आहे. बीकेसी ते ठाण्यादरम्यान प्रत्येकी ३० मिनिटांच्या अंतरानं ही सेवा धावणार आहे. चलो अॅपद्वारे (Chalo App) या बसमध्ये आसन आरक्षित केलं जाऊ शकतील. दिवसभर धावणाऱ्या बससाठी वांद्रे रेल्वे स्थानक (Bandra Railway Station) ते कुर्ला संकुलापर्यंत ५० रुपये भाडे आहे. तर वांद्रे कुर्ला संकूल (Bandra Kurla Complex) ते ठाण्यापर्यंत २०५ रुपये भाडे आकारले जाणार आहे. या नवीन प्रीमियम बस सेवेत (BEST Premium Bus) प्रवाशांसाठी खास स्वागत सवलत योजना देण्यात आली आहे. एकेरी भाड्यात ५ बस फेऱ्यांचा लाभ मिळणार आहे.

ठाणे ते वांद्रे कॉम्प्लेक्स (Thane to Bandra Complex) दरम्यान सकाळी ७:३० ते सकाळी ८:३० पर्यंत आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते ठाणे दरम्यान संध्याकाळी ५:३० ते संध्याकाळी ७:३० पर्यंत दर ३० मिनिटांनी धावेल. वांद्रे ते कुर्ला दरम्यान धावा. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते वांद्रे रेल्वे स्टेशन मार्गावर सकाळी ८:५० ते संध्याकाळी ५:३०पर्यंत आणि वांद्रे रेल्वे स्टेशन ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मार्गावर सकाळी ९:२५ ते संध्याकाळी ६:२५पर्यंत गाड्या धावतील. याशिवाय बेस्टची ही सेवा वांद्रे ते कुर्ला दरम्यानही धावणार आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते वांद्रे रेल्वे स्टेशन मार्गावर सकाळी ८:५० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत आणि वांद्रे रेल्वे स्टेशन ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मार्गावर सकाळी ९:२५ ते संध्याकाळी ६:२५ पर्यंत गाड्या धावतील. याशिवाय बेस्टची ही सेवा वांद्रे ते कुर्ला दरम्यानही धावणार आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते वांद्रे रेल्वे स्टेशन मार्गावर सकाळी ८:५० ते संध्याकाळी ५:५० पर्यंत आणि वांद्रे रेल्वे स्टेशन ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मार्गावर सकाळी ९:२५ ते संध्याकाळी ६:३५ पर्यंत गाड्या धावतील.

Christmas 2022 नाताळ सणात विशेष महत्व असलेला ‘ख्रिसमस ट्री’चा जाणून घ्या इतिहास

ही बससेवा सुरू झाल्यामुळे देशात इलेक्ट्रिक प्रीमियम बस सुरू करणारी बेस्ट ही पहिली संस्था ठरणार आहे. या बससेवेचे आरक्षण चलो अॅप वरून आपल्या घरात बसून करता येणार आहे

तुम्हाला Protein bar या पदार्थाची रेसिपी माहित आहे का? जाणून घ्या मग

Latest Posts

Don't Miss