spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी, पोलीस कोठडीत असलेल्या पत्रकाराची सुटका

मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शाळांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं. काल चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघालंय. आज सलग तिसऱ्या दिवशीही या वादाचे राजकीय पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली. यानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा तापू लागलंय. कारण शाईफेक केल्याच्या निषेधात भाजप (BJP) कार्यकर्तेही आक्रमक झालेत.

हेही वाचा : 

BEST Premium Bus बीकेसी ते ठाणे ‘बेस्टची प्रीमियम बस’सेवा सोमवारपासून होणार सुरू

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तिघांनी शाईफेक केली. यानंतर तीन जणांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, आरोपींवर ३०७ सारखे गंभीर कलम लावण्यात आल्याने सर्वपक्षीयांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असा आरोप करत मोरवाडी कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली. त्याचबरोबर पत्रकार गोविंद वाकडे हे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपींच्या आधीपासून संपर्कात होते असा त्यांच्यावर आरोप झाला होता. त्यानंतर काल रात्री गोविंद वाकडेंना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र आज पत्रकार गोविंद वाकडे यांना पिंपरी पोलिसांकडून सोडण्यात आले आहे. पत्रकार संघटनांच्या मागणीनंतर पोलिसांनी गोविंद वाकडे यांना सोडून दिलं आहे.

शाईफेक प्रकरण नेमकं काय?

मंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रमासाठी येणार होते. त्यासाठी शेकडोंचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिंचवडमधील भाजप पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी ते चहा पाण्यासाठी थांबले होते. चहा पाणी करून ते कार्यक्रमासाठी निघाले असता त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील हे पडता पडता वाचले. आंदोलनकर्त्यांनी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

शिंदे विरुद्ध ठाकरे, केंद्रीय निवडणूक आयोगात आजपासून खरी लढाई सुरू, संपूर्ण राज्याचे लक्ष

चंद्रकांत पाटील यांचं विधान

पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत,” असं पाटील म्हणाले.

Happy Birthday Sharad Pawar : जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील वयक्तिक नातं

Latest Posts

Don't Miss