spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाल्यानंतर, स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रान्च देणार अधिकची सुरक्षा

भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे. याशिवाय त्यांच्या पुण्यातील घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी गेलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकारही शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. त्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार वारजे पोलीस स्टेशनचे पन्नास पोलीस, क्राईम ब्रांचचे पाच अधिकारी, वाहतूक पोलिसांचे कर्मचारी चंद्रकांत पाटील यांचा सुरक्षेच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Cyclone Mandous मंदोस चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसला, सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची वाढली चिंता

चंद्रकांत पाटील जिथे जिथे जात आहेत त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांसह क्राईम ब्रांचचे पाच पोलीस अधिकारी तैनात करण्यात येत आहेत. राज्य पोलिस यांच्या सुरक्षेसोबतच चंद्रकांत पाटील यांना सीआयएसएफ या केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा देखील देण्यात आली आहे. तर यामध्ये देखील वाढ करण्याचा विचार सुरु आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कारवाई अका पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. अंकुश शिंदे यांनी आठ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकारी अशा एकूण ११ जणांना निलंबित केलं आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी शाई फेकली होती.

Indian Navy भारताच्या लष्करी इतिहासातील हे एक ऐतिहासिक पाऊल, पहिल्यांदाच महिलांना कमांडो होण्याची संधी

चंद्रकांत पाटील यांचं विधान

पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत,” असं पाटील म्हणाले.

शाईफेक प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

‘माझ्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळ्याच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले होते. त्यावर शाई टाकली गेली. निषेध करायला हरकत नाही, पण मग मला मारण्याचा हा प्रयत्न होता का?’ असा सवाल चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) उपस्थित केला होता.

अनिल देशमुख यांना कोर्टाचा दिलासा, जमीन मंजूर

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आठवड्यातून दोन दिवस देशमुख यांना ईडी कार्यालयात हजेरी लावणं गरजेचं असणार आहे. १३ महिन्यानंतर अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

BEST Premium Bus बीकेसी ते ठाणे ‘बेस्टची प्रीमियम बस’सेवा सोमवारपासून होणार सुरू

Latest Posts

Don't Miss