spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sula Vineyards IPO गुंतवणूकदारांसाठी कमाईची खुली संधी, सुला विनयार्ड्स या वाईन बनवणाऱ्या कंपनीचा IPO होणार लॉन्च

मद्य पेय बनवणारी कंपनी आता शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना कमाईची संधी देणार आहे. वाइन उत्पादक कंपनी सुला विनयार्ड्स १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर पर्यंत आपला IPO लॉन्च करणार आहे. सुला विनयार्ड्सने त्यांच्या रु. ९६०.३५ कोटी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी (IPO)३४०- ३६७ रुपये प्रति शेअरची किंमत निश्चित केली आहे.

हेही वाचा : 

Happy Birthday Rajinikanth सुपरस्टार ‘थलायवा’ यांचा आज ७२ वा वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्या जीवनाबद्दल

वाइन मेकर कंपनी सुला विनयार्ड्सचा IPO (IPO) १२ डिसेंबर २०२२ रोजी ग्राहकांसाठी खुला होणार आहे. यापूर्वी जुलै २०२२मध्ये, कंपनीने ड्राफ्ट रेडहेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) बाजार नियामक सेबी (SEBI) कडे सादर केला होता. कंपनीने लॉन्च होण्यापूर्वी १२००- १४००० कोटी रुपयांपासून इश्यू आकार कमी केला आहे. आता इश्यू आकार ९६०.३५ कोटी रुपये असेल. कंपनीने IPO साठी समभागांची किंमत निश्चित केली आहे. तो प्रति शेअर ३४०-३५७ रुपये ठेवण्यात आला आहे. माहितीनुसार, त्याची लॉट साइज ४२ शेअर्सची असेल.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाल्यानंतर, स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रान्च देणार अधिकची सुरक्षा

सुला विनयार्ड्सने १९९६ मध्ये पहिली द्राक्ष बाग उघडली. त्यानंतर २००० साली कंपनीने वेगवेगळ्या प्रकारच्या द्राक्षांपासून वाईन बनवण्यासही सुरुवात केली. कंपनी १३ वेगवेगळ्या ब्रँड्सच्या अंतर्गत ५६ प्रकारच्या वाइन तयार करते. कंपनीचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण सहा उत्पादन युनिट आहेत. गेल्या वर्षी कंपनीचा नफा ५२.१४ कोटी रुपये होता. सुला व्हाइनयार्ड्सच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत वाइनची विक्री आहे. पण त्यात उत्पन्नाचे इतरही स्रोत आहेत. कंपनीचे दोन वाइन रिसॉर्ट्सही आहेत. पर्यटक त्यात राहतात. ते वाइन टेस्टिंग करतात. यामुळे कंपनीला कमाईही होते. हे दोन्ही रिसॉर्ट महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहेत.

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी, पोलीस कोठडीत असलेल्या पत्रकाराची सुटका

Latest Posts

Don't Miss