spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आज जयंती असून, पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर त्यांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) भावूक झाल्या. यावेळी वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना गहिवरुन आलं होतं. तसंच आपण आज मौन का बाळगलं होतं याचा खुलासा करत वादग्रस्त विधानं करणाऱ्यांवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, महापुरुषांच्या बद्दल बोलण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार नाही. त्या काळात त्यांनी कसा संघर्ष पेलला हे पाहण्यासाठी आपण होतो का? असं पंकज मुंडे म्हणाल्यात. पंकजा मुंडे यांनी कार्यककर्त्यांना संबोधित करताना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवल्या. गोपीनाथ मुंडे यांनी कायम लोकांच्या कल्याणासाठी काम केलं.ते श्रीमंत राजकारणी होते. त्यांची श्रीमंती पैसा, जमीन-जुमला किंवा सोन्या नाण्यात मोजता येणारी नव्हती. कारण त्यांनी सोन्याहून मौल्यवान गोष्ट कमावली, ती म्हणजे प्रेम करणारी हक्काची माणसं… त्यांचा तोच वारसा मी पुढे चालवतेय. प्रेम करणाऱ्या माणसांमुळे मीही प्रचंड श्रीमंत आहे, असं पंकजा म्हणाल्या आहेत. यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

“महापुरुषांविषयी बोलणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण त्यातून प्रेरणा घेण्यासाठी आपण बोलायचं असतं. एखादी व्यक्ती चांगल्या भावनेने बोलते, तेव्हा एखादा शब्द वर खाली जाण्याची वाट पाहून बोभाटा करणं हादेखील महापुरुषाचा अवमान करणंच आहे. त्या भावना चुकीच्या पद्धतीने कशा पोहोचतील हे पाहणंही महापुरुषाचा अपमान आहे,” असं पंकजा मुंडे यांनी सुनावलं. “आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेल्या बलिदानांचं मोजमाप करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. आमच्या शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे चित्र पाहून माझं मन खिन्न झालं. महापुरुषांविषयी वाईट बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण तेव्हा जिवंत होतो का? तेव्हा तलवारीला धार कशी द्यायची, युद्ध कसं करायचं, तह कसा करायचा, कसे जिंकायचे हे माहिती आहे का? तो संघर्ष कसा होता हे पाहायला आपण तिथे नव्हतो. त्यामुळे त्याचा सन्मान करता येत नसेल, तर थट्टाही करु नये,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे ही वाचा : 

Elton John चुकीची माहिती या कारणास्तव संगीतकार एल्टन जॉन यांनी घेतला ट्विटरसंबधी मोठा निर्णय

अनिल देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती

‘प्रेमात लागलेल्या अनेक ‘बांबूं’ची गोष्ट…’ ‘बांबू’ चित्रपटाचा टीझर सर्वत्र प्रदर्शित

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss