spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांना शिंदेंकडून अभिवादन

गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर देखील जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत यावे अशी भूमिका मांडली होती. शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू शकत नाही, असे म्हटलं होते. “बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने एक सामान्य शिवसैनिक आता मुख्यमंत्री झालेला आहे. बाळासाहेबांनी नेहमी सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र मध्ये मराठी माणसाला ताठ मानेने जगवण्याचे बाळासाहेबांनी शिकवले”. असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

हेही वाचा : 

वसईत घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू

शिंदेंनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. ‘बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….’ या ओळी ट्विटरवर पोस्ट करत शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन केलं आहे.

भान हरवणारा खोरनिनकोचा धबधबा

Latest Posts

Don't Miss