spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gujarat भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा घेतली गुजरात मुख्यमंत्री पदाची शपथ

Bhupendra Patel : गुजरातमध्ये (Gujarat) नवे सरकार स्थापन झाले आहे. भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी आज गांधीनगर (Gandhinagar) येथे आयोजित समारंभात गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुजरातमधील गांधीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री शपथ विधीच्या (Oath ceremony) कार्यक्रमाला सहभागी झाले होते.

गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. गुजरात विधानसभा (Gujrat Election) निवडणुकीत भाजपनं (Gujrat BJP) विजय मिळवला. भाजपला १५६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवला. गुजरातमध्ये भाजपने आतापर्यंत सर्वाधिक जागा मिळवत सरकार स्थापन केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने १८२ पैकी विक्रमी १५६ जागा जिंकल्या. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा हा सलग सातवा विजय आहे. काँग्रेसने १७ तर आम आदमी पक्षाने (आप) पाच जागा जिंकल्या आहेत. भूपेंद्र पटेल यांनी घाटलोडिया जागेवर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा १.९२ लाख मतांनी पराभव केला. विजय रुपानी यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पटेल यांना राज्याची सूत्रे मिळाली होती.

हे ही वाचा : 

Twitter Account तब्ब्ल १५० कोटी ट्विटर अकाउंट करणार डिलीट, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय

नाना पाटोले यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss