spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Circus चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर सिंगसह जॅकलिन फर्नांडिस ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर

‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) हा झी मराठीवरून (Zee marathi) प्रसारित होणारा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. यातील प्रत्येक कलाकारानं आपल्या अभिनयाद्वारे स्वतःचं असं वेगळं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं आहे. कार्यक्रमाची लोकप्रियता अफाट असल्यानं यात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या आगामी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी मराठी तसंच हिंदी सिनेविश्वातील कलाकार कायम उत्सुक असतात. आतापर्यंत अनेक कलाकार मंडळी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी चला हवा येऊ द्याच्या सेटवर आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली आहे.

हेही वाचा : 

Gujarat भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा घेतली गुजरात मुख्यमंत्री पदाची शपथ

१२ डिसेंबर २०२२ या दिवशी चला हवा येऊ द्याच्या प्रसारित होणाऱ्या भागात हिंदीचित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आणि प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आपल्या आगामी चित्रपटाच्या (circus movie) टीमसह प्रमोशनसाठी उपस्थित आहेत. रणवीरनं त्याच्या मनमौजी स्वभावामुळे सेटवर धम्माल केली. इतकंच नाही तर कार्यक्रमातील सर्व कलाकारांसोबत खूप धम्माल मस्ती केली.

Twitter Account तब्ब्ल १५० कोटी ट्विटर अकाउंट करणार डिलीट, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय

नेहमीप्रमाणे भाऊ कदम (Bhau kadam) यांनी रणवीर सिंगची भूमिका वठवली. त्यांच्या एण्ट्रीनेच संपूर्ण सेटवर एकच हशा पिकला. भाऊ यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते सिंबा स्टाइलमध्ये सेटवर एण्ट्री घेतात आणि नंतर सर्वांना आपुलकीने भेटतात. यावेळी रणवीर त्यांना घट्ट मिठी मारतो. नंतर तो रणवीरच्या एनर्जीमध्येच सेटवर जातो आणि भारत गणेशपुरे यांना घट्ट मिठी मारून त्यांच्या कपाळाचं चुंबन घेतो आणि भाऊ कदमच्या अभिनयाची बेटिंग सुरु होते. आजच्या भागात वरुण शर्मा, जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, वृजेश हिरजी, मुकेश तिवारी, संजय मिश्रा, जॉनी लिवर, सिद्धार्थ जाधव आणि अश्विनी काळसेकर अशा अनेक कलाकारांचा गर्दी चला हवा येऊ द्याच्या सेटवर पाहायला मिलनात आहे. सर्कस हा चित्रपट २३ डिसेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

‘प्रेमात लागलेल्या अनेक ‘बांबूं’ची गोष्ट…’ ‘बांबू’ चित्रपटाचा टीझर सर्वत्र प्रदर्शित

Latest Posts

Don't Miss