spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारत चीन मुद्यावर राजनाथ सिंह यांचे संसदेत उत्तर

कालपासून भारत चीन वाद (India China dispute) पुन्हा एकदा दिसून आला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर येत आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तवांगजवळ (Tawang) नुकतीच ही झटापट झाली. अशी बातमी काल समोर आली. त्यानंतर या मुद्द्यावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी संसदेत उत्तर दिलं आहे. ९ डिसेंबर रोजी चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चीनला आपल्या देशात परत जावे लागले. ते म्हणाले की, या चकमकीत आमचा एकही जवान शहीद किंवा गंभीर जखमी झालेला नाही.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत बोलत होते. अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारताची चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुपारी १२ वाजता संसदेत लेखी निवेदन वाचून दाखवले. ते म्हणाले, “९ डिसेंबर रोजी पीएलएच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात घुसखोरी तसेच अतिक्रमण केले. आमच्या जवानांनी या प्रयत्नाला खंबीरपणे तोंड दिले. आमच्या सैनिकांनी धैर्याने या परिस्थितीचा सामना केला आणि चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले.”

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “हा मुद्दा चीनकडेही गंभीरतेने उचलला गेला आहे. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की, भारतीय सैन्य आपच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच इतर कोणत्याही परिस्थितीला आव्हान देण्याचा प्रयत्न पराभूत करण्यास तयार आहेत. राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “या लढाईत दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले. मात्र मी या सदनाला सांगू इच्छितो की आमचा एकही सैनिक शहीद झाला नाही किंवा त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सच्या वेळीच हस्तक्षेपामुळे, चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे.”

हे ही वाचा : 

Pune Bandh पुण्यातील मोर्चात मुस्लिम बांधव शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि आंबेडकरांचे पोस्टर घेऊन सहभागी

Pune Bandh पुण्यातील मोर्चात मुस्लिम बांधव शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि आंबेडकरांचे पोस्टर घेऊन सहभागी

NCP Chief Sharad Pawar अज्ञात व्यक्तीकडून पवारांना जीवे मारण्याची धमकी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss