spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Zika virus झिका व्हायरसने कर्नाटकाचे दार ठोठवले, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा विषाणू

कोरोना व्हायरसनंतर (Corona virus) आता झिका व्हायरसनेही (Zika virus) देशात दार ठोठवले आहे. या व्हायरसचा पहिला बाधित रुग्ण कर्नाटकात समोर आले आहे. पाच वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणाले की, पाच वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील हे पहिलेच प्रकरण असून सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे.

हेही वाचा : 

संजय राऊतांचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर हल्लाबोल

झिका व्हायरस

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, झिका विषाणू एडिस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्यू, चिकुनगुनिया आणि पिवळा ताप देखील एडिस डासांच्या चावण्याने पसरतो. हे तिन्ही विषाणू जवळपास सारखेच आहेत. या तिघांचा प्रसार पश्चिम, मध्य आफ्रिका आणि आग्नेय आशियामधून सुरू झाला. झिका विषाणू गर्भवती महिलेपासून तिच्या न जन्मलेल्या बाळापर्यंत पसरतो.

संक्रमित लोकांना माहित नाही

झिका पसरल्यानंतर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, झिकाची लागण झालेल्या ८० टक्के लोकांना या विषाणूची लागण झाल्याचे माहित नव्हते. त्यांच्यामध्ये झिकाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. ताप, स्नायू आणि सांधेदुखी, डोकेदुखी यांसारख्या समस्यांनी मोजक्याच लोकांना ग्रासले होते. या अभ्यासानंतर, हे स्पष्ट झाले की त्याची लक्षणे खूप सामान्य असल्याने लोकांना हे देखील माहित नाही की ते या विषाणूच्या विळख्यात आले आहेत.

Pune Bandh पुण्यातील मोर्चात मुस्लिम बांधव शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि आंबेडकरांचे पोस्टर घेऊन सहभागी

झिका व्हायरसवर उपचार कोणते?

झिका व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही आहे आणि कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांला डॉक्टर ताप किंवा डोके दुखीसाठीच्या औषधाची शिफारस करतात. तसंच, अधिक आराम करण्याचा सल्ला देतात. साधारण पणे डास हे आंधाऱ्या जागी, ओलसर ठिकाणी किंवा साचलेल्या पाण्यात असतात. त्यामुळं अशा जागा वेळोवेळी स्वच्छ करा. तसंच, रात्री झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करा. हा व्हायरस जीवघेणा नसला तरी ही काळजी घ्या. विशेषतः गर्भवती महिलांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञ करत आहेत.

Samruddhi Mahamarg औरंगाबादहून नागपूरला जाणारी लाल परी ‘या’ तारखेपासून धावणार समृद्धी महामार्गावर

Latest Posts

Don't Miss