spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुषमा शिरोमणी यांना जीवनगौरव तर पत्रकारितेसाठी रविंद्र पाथरे यांना कलागौरव पुरस्कार जाहीर

तपश्चर्या बारा वर्षांची असते असे आपण मानतो. त्यात अनेक अडथळे आणि आपत्ती येत असतात आणि तरीही ती जिवाच्या आकांताने पूर्ण करायची असते. अर्चना नेवरेकर फाउंडेशन या संस्थेने गेली अकरा वर्षे प्रामाणिकपणे कलेचा आणि कलाकारांचा सन्मान करण्याचे आपले ध्येय साध्य केले आणि आता बाराव्या वर्षी त्यांनी आपले वार्षिक पुरस्कार “कलादर्पण” या नावाने प्रदान करायचे ठरवले असेल तर ही तपश्चर्या सुफळ संपूर्ण झाली असेच म्हणावे लागेल.

कलेचा सन्मान आणि कलाकारांचा आदर आजवर अखंड करीत असताना आपल्या सर्वांना करोनाच्या महामारीने त्रस्त केले होते आणि त्यामुळे आपण ‘संस्कृती कलादर्पण पुरस्कार’ प्रदान करू शकलो नव्हतो. परंतु येत्या २७ डिसेंबर रोजी मुंबईच्या सन अँड सँड येथे आपले आवडते पुरस्कार एका नव्या जोमाने सुरु करणार आहोत. २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये यात सहभागी झालेल्या नाटक, चित्रपट, मालिका आणि वृत्त वाहिन्या यांची नामांकने जाहीर करतोय.
संस्थेच्या संचालक मंडळावर स्मिता जयकर, सुप्रिया पाठारे, प्रदीप कबरे, सविता मालपेकर, मानसी इंगळे, प्रमोद पवार, मिलिंद गवळी, मिलिंद इंगळे, अलका कुबल, तृप्ती अक्कलवार जाधव, रोहिणी निनावे, शीतल कर्देकर आणि रमेश साळगावकर आहेत.
या वर्षीचा “कला गौरव” हा सन्मान पुरस्कार श्रीमती सुषमा शिरोमणी यांना प्रदान करण्याचे जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
नाटकांच्या परीक्षक समितीत रोहिणी निनावे, स्मिता जयकर, प्रमोद पवार, रमेश साळगावकर आणि शीतल करदेकर होत्या तर चित्रपटांसाठी समृद्धी पोरे, अभिजित पानसे आणि मिलिंद इंगळे तसेच मालिकांसाठी स्मिता जयकर, मानसी इंगळे आणि कल्पना सावंत-नवले यांचा समावेश होता.
यासाठीच्या पत्रकार परिषदेत बोलताना अर्चना नेवरेकर म्हणाल्या, “निर्मितीची क्षमता, जाग आणि जाण असलेले आपण कलाकार आहोत आणि हे आपले पुरस्कार आहेत. स्मिता जयकर अगदी सुरुवातीपासून माझ्या पाठीशी भक्कम उभ्या असल्यामुळेच ही तपश्चर्या आम्ही पूर्ण करू शकलो. आणखी बराच मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी तुमची साथ आणि आशीर्वाद यांची आवश्यकता आहेच.”

हे ही वाचा : 

मराठवाडा, विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे, अजित पवार यांची मागणी

मराठवाडा, विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे, अजित पवार यांची मागणी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss