Ved Marathi Movie : रितेश देशमुख (Rietesh Deshmukh) आणि जेनेलिया(Genelia) च्या चाहत्यांना आतुरता आहे ती वेड सिनेमाची सिनेमाचे जबरदस्त ट्रेलर हा रिलीज झाला आहे. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचं ‘वेड’ आता प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्या चित्रपटाची चर्चा सुरू होती. ‘वेड’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते आता ट्रेलर वाट पाहत आहे, मात्र आता त्याची प्रतीक्षा संपणार आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर आज १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. प्रेम आणि वेड या दोन शब्दांभोवती या चित्रपटाची कथा फिरते, हे या ट्रेलरवरून लक्षात येतं. वेड चा ट्रेलर पाहून मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.एकतर्फी प्रेम आणि त्यातलं वेड असा एकंदर सिनेमाचा विषय आहे. रितेश आणि जेनेलियाची रिअल लाईफ जोडी बऱ्याच काळानंतर रील लाईफ मध्येही बघायला मिळणार आहे.
अभिनेत्री जिनिलिया या चित्रपटाद्वारे तिच्या मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तर ‘वेड’मधून रितेश देशमुख दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्यामुळं या दोघांसाठी हा चित्रपट नक्कीच खास आहे. तर रितेशने आपल्या चित्रपटासाठी संगीतकार अजय(Ajay Gogavale) आणि अतुल गोगावले (Atul Gogavale) यांची निवड केली. आज ट्रेलर लाँन्च दरम्यान रितेश म्हणाला, “अजय-अतुलसोबतचे माझं नातं तेव्हापासून सुरू झालं जेव्हा मी माझा पहिला मराठी चित्रपट लय भारी (२०१४) केला आणि आता मी पहिल्यांदाच मराठी चित्रपट दिग्दर्शित करत आहे, त्यामुळे अजय-अतुल माझी पहिली पसंती आहे. मला याचा खूप आनंद आहे की ते माझ्या चित्रपटात काम करत आहे आणि चित्रपटासाठी संगीत खूप महत्त्वाचे आहे.”
‘वेड’च्या ट्रेलरमध्ये काय आहे?
ट्रेलरमध्ये रितेश-जेनिलियाच्या रोमॅंटिक अंदाजासोबत त्यांचं बिनसलेलं नातं स्पष्ट दिसत आहे. दोघांनीही एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम केलं आहे. पण लग्नाच्या सात वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. प्रेम तू ही केलंस आणि मी ही, वेड तुझ्यातही आहे आणि माझ्यातही, बायकोच्या पगारावर जगताना लाज नाही वाटत, असे ट्रेलरमधील दमदार डायलॉग प्रेक्षकांना ‘वेड’ (Ved) लावत आहेत.
View this post on Instagram
‘वेड’ या सिनेमातील गाण्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून जेनिलिया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तर दिग्दर्शक म्हणून रितेशचा हा पहिलाच सिनेमा आहे. तसेच रितेश आणि जेनिलियाने या सिनेमाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यांनी ‘देश म्युझिक’ या नावाचं एक म्युझिक लेबल सुरू केलं आहे.
ट्रेलरमधील रितेश-जेनिलियासह विद्याधर पाठारे आणि अशोक सराफ यांच्या अभिनयाचंदेखील प्रचंड कौतुक होत आहे. हा सिनेमा येत्या ३० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीजआधीच हा सिनेमा सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सिनेमांच्या यादीत (IMDB) पहिल्या क्रमांकावर आहे.
‘वेड’ या सिनेमात जेनेलिया देशमुख, रितेश देशमुख, अशोक सराफ, विद्याधर जोशी आणि शुभंकर तावडे मुख्य भूमिकेत आहेत. तर आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहे. तर मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होणार आहे. आता रितेश-जेनिलियाचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.