spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी फोन करुन धमकी देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी फोन करुन धमकी देण्यात आली. २ डिसेंबरला ही धमकी मिळाल्याचे सांगितलं जात आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. ‘सिल्वर ओक’मधील टेलिफोन ऑपरेटरने याप्रकरणी ग्रामदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती सापडली असून पोलीस त्याची कसून चौकशी करत असं अजित पवारांनी दिली.

महापुरुषांबाबत केलेल्या विधानांवर अजित पवार म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सातत्याने अपशब्द वापरण्याचे वाचाळवीरांचे काम थांबणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

शरद पवारांना दिलेल्या धमकीबाबत अधिक माहिती देताना अजित पवार म्हणाले, “शरद पवारांचे स्वीय सहाय्यक राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती बाहेरच्या राज्यातील आहे. ती विकृत आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, याची चौकशी करण्याचं काम पोलीस करत आहेत. परंतु, त्यांचे फोन येते होते, ती व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. अतिशय खराब शब्द वापरत होती. दिवाळीत हे फार चालू होतं. तेव्हा तक्रार केल्यानंतर ही व्यक्ती सापडली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे ?

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचा काल (सोमवारी, १२ डिसेंबर) वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ माजली आहे. मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. या व्यक्तीनं फोन करून पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलानं ठार मारणार असल्याचं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिनं फोनवर म्हटलं आहे. धमकी देणारी व्यक्ती हिंदीत बोलत होती. अशी माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : 

आता नवीन वर्षात ठाकरे विरुद्ध शिंदे सामना

जी २० परिषदेच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई जोरदार तयारी सुरु

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss