spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रकाश अंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) मुख्यमंत्री एकनाश शिंदे (Eknash Shinde) यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. प्रकाश आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्या बाबत. चर्चा केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्याची माहिती ताजी असताना आज ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ठाकरे गटासोबत जाईल, असंही स्पष्ट केलं होतं. या सगळ्या घडामोडींनंतर आज मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर आज फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीदेखील भेट घेत असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर आज मंत्रालयात गेले. तिथे त्यांनी राज्याच्या दोन्ही प्रमुखांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मध्यप्रदेश ऐवजी दिल्लीहून बनवून आणण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

हे ही वाचा : 

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Mission Majnu अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘मिशन मजनू’ची रिलीज डेट झाली जाहीर

Bigg Boss Marathi 4 : किरण माने आणि प्रसाद जावडे यांच्यातील वाद मारामारीपर्यंत पोहोचला ? पहा नेमक काय झालं.

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss