spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राजीनामा देण्यासाठी उदयनराजे दिल्लीला गेले असतील?,असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला

राज्यपाल या घटनात्मक पदबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पण, या पदावर बसलेली व्यक्ती आदराच्या लायकीची नाही. जेव्हा-जेव्हा ते महापुरुषांबद्दल बोलले तेव्हा गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना रोखले नाही. आमच्या ४० चुकार भावांनी देखील त्यांना थांबवले नाही. महापुरुषांच्या बदनामीचे सुनियोजित षडयंत्र देवेंद्रजींच्या नेतृवात सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

सध्या भाजपला महापुरुष म्हणून गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारच हवे आहेत, बाकी महापुरुषांना त्यांना मोडीत काढायचं आहे, असा हल्लाबोल (Shiv Sena) सुषमा अंधारे (sushma Andhare) यांनी भाजपवर केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सरकार चालवत आहेत. त्यांनी फक्त पक्षापुरता नाहीतर राज्याचा विचार करायला हवा. फडणवीस एका पक्षाचे उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री नसून महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, हे देवेंद्र फडणवीसांना लक्षात आणून द्यायला हवं. भाजपला महापुरुष म्हणून गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवारच हवे आहेत. बाकी महापुरुषांना त्यांना मोडीत काढायचं आहे. यासाठी हा सगळा प्रकार ठरवून केला जात आहे, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी भाजपवर केला आहे.

महापुरुषांचा अवमान होत असल्याबद्दल उद्विग्न होऊन कदाचित राजीनामा देण्यासाठी उदयनराजे (Udayanaraje) दिल्लीला गेले असतील, अशी टिप्पणी करून अंधारे म्हणाल्या, उद्योग गुजरातला, मंत्री गुवाहाटीला (Guwahati), गावे कर्नाटकात (Karnataka) आणि आपण आज लाल महालात ( Red Palace), असेही अंधारे यांनी नमूद केले. तसेच एकनाथभाऊ बाजूला बसले असून महाराष्ट्राचे स्टिअरिंग देवेंद्रजींच्या हातात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नरेंद्र मोदी यांना रावण म्हटल्यानंतर त्यांच्याविरोधात बोलण्यासाठी देवेंद्रजी हिरीरीने पुढे आले. पण, महापुरुषांचा अवमान होतो तेव्हा चकार शब्दही बोलत नाहीत. राज्यपालांना परत बोलवा, असे पत्रही महाशक्तीला पाठवत नाहीत. त्यांच्याविरोधात निंदाजनक ठरावही विधीमंडळात मांडला जात नाही, असे मुद्दे अंधारे यांनी उपस्थित केले.

हे ही वाचा : 

घरच्या घरी बनवा हॉटेल सारखं चविष्ट Paneer Butter Masala

Avtar 2 : दिग्दर्शक जेम्स कॅमरुन तब्बल १३ वर्ष करत होता एकाच सिनेमावर काम

प्रकाश अंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss