spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तांब्याच्या भांड्यातील पाणी हिवाळ्यात का फायद्याचे आहे घ्या जाणून

तुम्ही लहान पणापासून ऐकलं असेलच की तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन करण्याचा संबंध हा थेट तुमच्या आरोग्याशी निगडित असतो. तसेच पाण्याचेही अनेक फायदे हे तुम्हाला ठाऊकच असतील पण तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे हे तुम्हाला माहित नसतील. पण हिवाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हे जास्त उपयोगी ठरते. याचे फायदे आयुर्वेदातही दिलेले आहेत.

जस की आपल्याला माहीतच आहे. की हिवाळा हा ऋतू गुलाबी थंडी बरोबरच अनेक आजारही घेऊन येतो. या ऋतूत सर्दी, खोकला, ताप, घसा दुखी, सांधे दुखी, संधिवात असलेल्या रुग्णांसाठी सतत वात येणे असे अनेक आजार हिवाळ्यामध्ये उद्भवू शकतात . यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, जर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर तुम्हाला हे आजार होण्याची शक्यता ही कमी होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ताब्याच्या भांड्यातील पाणी हे उपयोगी ठरत. तसेच या पाण्याचे अनेकांची फायदे आहेत.

लोहाची कमतरता दूर होते:

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने भांड्यातील तांब्याचा अर्क थोड्याफार प्रमाणात त्या पाण्यात मिसळतो. ते पाणी शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करून घेण्यास आणि पेशी तयार करण्यास मदत करते.

सांधेदुखीसाठी कमी करण्यास मदत करते : हिवाळा म्हंटलं तर संदेदुखी या समस्येला बऱ्याच लोकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

त्वचेसाठी उपयुक्त :

तांब्याच्या भांड्यातील पाणी वापरल्याने शरीरातील नवीन पेशी तयार होण्यास मदत होते, तर त्यामुळे त्वचा अजून चांगली होते.

हृदयाच्या समस्येपासून आराम:

तांबे हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो, ही गुणधर्म तांब्यात असल्यामुळे हृदयविकारासाठी हे पाणी उपयुक्त ठरू शकते.

पचनक्रिया सुधारते :

तांब्याच्या भांड्यामुळे पचनक्रिया सुधारते , कारण तांबे बॅक्टेरिया कमी करण्याचे काम करतात, आणि पोट साफ करण्याचे काम करते.

हे ही वाचा : 

Bigg Boss16: साजिदने अब्दूच्या पाठीवर लिहिलेला संदेश पाहून नेटकरी संतापले, पहा नेमक काय झालं

पाटलांच्या शाईफेक प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय

Bigg Boss Marathi 4 : किरण माने आणि प्रसाद जावडे यांच्यातील वाद मारामारीपर्यंत पोहोचला ? पहा नेमक काय झालं.

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss