spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत गृहमंत्री यांची घेणार भेट

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्टाचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे देखील Delhi दिल्लीत हजर राहणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Amit Shah हे आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई Basavaraj Bommai आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.

महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) या Borderism मुद्यावरुन महाविकास आघाडीच्या खासदारांनी ९ डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर अमित शाह येत्या १४ डिसेंबरला (December) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिली होती.

 

कर्नाटक मधील बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीकडून आणि इतर परिसर महाराष्ट्राला देण्याबाबत तडजोड करु नये, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत या प्रकरणाचा तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यामुळे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट घेणार असून अमित शाह या वादावर काय तोडगा काढणार का या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादाचे प्रकरण न्यायालयात मध्यंतरी असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने वक्तव्य केली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले होते. महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले केले जात आहेत. राज्यातील मंत्रयांना कर्नाटकमध्ये येण्यापासून थांबवले जात आहे. संविधान नुसार दिलेल्या अधिकारानुसार देशात कोणत्याही ठिकाणी जाण्याचा हक्क आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व तक्रारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना सांगितल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे. आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबच अमित शाह (Amit Shah) चर्चा करणार असून काय तोडगा काढणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा : अर्जुन तेंडुलकरचे रणजीमध्ये पदार्पण, पहिल्या दिवशी नाबाद फलंदाजी

 

Latest Posts

Don't Miss